श्वानाच्या मृत्यू प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल; अंबरनाथ मधील विचित्र घटना

अंबरनाथ मध्ये विचित्र घटना घडली आहे. श्वानाच्या मृत्यू प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Updated: Dec 23, 2023, 09:55 PM IST
श्वानाच्या मृत्यू प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल; अंबरनाथ मधील विचित्र घटना title=

Ambernath News : श्वानाच्या मृत्यू प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. अंबरनाथ मध्ये ही विचित्र घटना घडली आहे. या प्रकरणी कार चालकाला अटक करण्याची मागणी देखील केली जात आहे. सध्या संपूर्ण अंबरनाथमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. 

अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात एका श्वानाला भरधाव कारने चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. या  प्रकरणी कारचालका विरोधात अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

अंबरनाथच्या बारकूपाडा प्रकाश नगर भागात केतन गरुड यांचा हा श्वान होता. हा श्वान रस्त्याच्या पलीकडे जात असताना एका भरधाव कारने त्याला चिरडले. या प्रकरणी केतन  यांनी कार चालका विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर चालका विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 429 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा सगळ्या प्रकाराचा सीसीटीव्ही  कॅमेरात कैद झालाय. सदर कार चालकाला अटक करावी अशी मागणी केतन गरुड याने केली आहे.

चायनिज हॉटेलमध्ये भटक्या कुत्र्याची हत्या

मुंबईतील मुलुंडच्या एका चायनिज हॉटेलमध्ये भटक्या कुत्र्याची हत्या करण्यात आली होती. हॉटेल कर्मचारी नीरज नेपाळीवर हा कुत्रा भुंकत असल्यानं त्याने कुत्र्यावर चॉपरने वार केले. यात कुत्र्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली..तर प्राणी मित्रांनी आरोपीवर ताततडीनं कारवाईची मागणी केली.  

तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाळीव कुत्र्याच्या मालकावर अखेर गुन्हा दाखल

तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाळीव कुत्र्याच्या मालकावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पिटबूल जातीच्या पाळीव कुत्र्यानं तरुणाचे लचके तोडले होते. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना MIDC परिसरातील लक्ष्मीनारायण टॉकीजवळ घडली होती. या घटनेनंतर कुत्र्याचा मालक अडचणीत आलाय. पोलिसांनी नितीन आंबोरे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. 

चार वर्षाच्या मुलावर भटक्‍या कुत्र्यांचा प्राणघातक हल्ला

पुणे जिल्ह्यातील चाकण जवळील आंबेठाण परिसरात एका चार वर्षाच्या मुलावर भटक्‍या कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केला होता.गणेश लांडगे असे या चार वर्षीय मुलाचे नाव असून त्याच्या हाताचे पायाचे डोक्याचे लचके तोडले होते. या हल्ल्यात गणेश गंभीर जखमी झाला होता. आंबेठाण परिसरात भटक्‍या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून रात्री – अपरात्री फिरणाऱ्या या मोकाट कुत्र्यांमुळे नागरीकांना घराबाहेर पडणे ही अत्यंत जिकरीचे झाले आहे.त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.