Crime News : कुत्र्याचा खून थेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं काय घडल?

कुत्र्याची हत्या झाल्यानंतर पिलं आसपास रांगत होती... यांना कळतच नव्हतं आपल्या आईला काय झालय.

Updated: Jan 31, 2023, 11:35 PM IST
Crime News : कुत्र्याचा खून थेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं काय घडल?

Dog Murder : कुत्र्याचा खून केल्या प्रकरणी  थेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल जाला आहे. संभाजी नगर (Sambhaji Nagar) मध्ये ही घटना घडली आहे. भुंकल्याच्या रागातून पाळीव कुत्र्याचा जीव घेण्यात आला आहे (Dog Murder). या प्रकरणी चार जणांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे (Crime News).

कांबळे असे मृत कुत्र्याच्या मालकाचे नाव आहे.  जुन्या वादातून आरोपी कांबळे कुटुंबाच्या घरात घुसले आणि घरातील सामानाची नासधूस केली. तेव्हा स्वीटी नावाचा पाळीव कुत्रा गुन्हेगारावर भुंकायला लागला. तेव्हा गुन्हेगाराने कुत्र्याला डोक्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात कुत्र्याला जबर मार लागल्याने ती विव्हळू लागली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. 

या कुत्रीला काही दिसांपूर्वीच पिल्लं झाली होती. कुत्र्याच्या मृतदेहजवळ ही पिल्लं अक्षरशः रांगत होती. हे दृश्य पाहून कांबळे कुटुंबही रडायला लागले त्यानंतर पेट लव्हर्स अससोसिएशन च्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली आणि अखेर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

कोणतेही प्राणी तसेच पाळीव प्राण्यांची हत्या कररणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर प्राण्यांवर क्रूरता केल्याप्रकरणी प्रतिबंधक कायद्याच्या कलम 11 अंतर्गत परिभाषित केल्यानुसार हा गुन्हा आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 428 आणि कलम 429 नुसार हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यानुसार आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत.

उंदराचे पोस्टमार्टम

उत्तर प्रदेशमधील (UP) बदायूंपासून (Budaun)येथील आहे. 25 नोव्हेंबर 2022 रोजी मनोज नावाच्या व्यक्तीने एका उंदराला नाल्यात बुडवून मारले. आरोपीने उंदराची शेपटी दगडाला बांधून नाल्यात फेकल्याचा आरोप करण्यात आला. नंतर तेथून जाणाऱ्या विकेंद्र शर्मा या प्राणीप्रेमीने उंदराला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही आणि उंदराचा मृत्यू झाला. यानंतर उंदराच्या मृत्यूने दुखावलेला विक्रेंद शर्मा पोलीस स्टेशनला पोहोचला आणि आरोपी मनोजविरुद्ध एफआयआर नोंदवला. त्यानंतर यूपी पोलिसांची तपासाला सुरुवात केली. यानंतर उंदराचे पोस्टमार्टम करण्यात आले.