VIDEO : ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात, अंगावर शहारे आणणारा थरार

रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या वाहनांना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. (Truck Accident In Navi Mumbai) या ट्रकच्या धडकेत नऊ गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  

Updated: Jun 17, 2021, 10:08 PM IST
VIDEO : ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात, अंगावर शहारे आणणारा थरार

नवी मुंबई : रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या वाहनांना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. (Truck Accident In Navi Mumbai) या ट्रकच्या धडकेत नऊ गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे. भरधाव ट्रकचा हा थरार पाहिल्यानंतर बघणाऱ्याच्या अंगावर शहारे येतात.

नवी मुंबईमधील महापे येथून कोपरखैरणेच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुसाट जाणारा हा ट्रक रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या 9 चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर धडक दिली. ही घटना आज गुरुवारी दुपारी कोपरखैरणे सेक्टर-1 मध्ये घडली. 

या अपघातात कुणी जखमी झाले नसले तरी या अपघातात 5 कार आणि 4 दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर ट्रक चालकाने पलायन केले आहे. कोपरखैरणे पोलिसांनी त्याच्या ट्रक ताब्यात घेऊन त्याचा शोध सुरु केला आहे.  हा सर्व थरार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे.