यवतमाळ - नागपूर बायपासवर विचित्र अपघात

एसटी बस, बोलेरो आणि दुचाकी या तीन वाहनात झालेल्या अपघातात बस मधील १५ ते २० प्रवासी आणि दुचाकीस्वार दोघे जण किरकोळ जखमी झाले. 

Updated: Aug 29, 2018, 08:14 PM IST
यवतमाळ - नागपूर बायपासवर विचित्र अपघात

यवतमाळ : नागपूर बायपासवर विचित्र अपघात झाला, एसटी बस, बोलेरो आणि दुचाकी या तीन वाहनात झालेल्या अपघातात बस मधील १५ ते २० प्रवासी आणि दुचाकीस्वार दोघे जण किरकोळ जखमी झाले. 

यवतमाळ इथून राळेगावकडे जाणाऱ्या बसची समोरून येणाऱ्या बोलेरो वाहनाशी जोरदार टक्कर झाली. त्यामुळे बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस ने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील बापलेक दोघे जखमी झाले तर बस खड्यात घसरली. त्यामुळे बस मधील चालकासह १५ ते २० प्रवासी जखमी झाले.