आधी आपल्या प्रेमाला संपवलं, आता स्वत:लाच संपवलं... बातमी वाचून तुम्हालाही येईल चीड

खरंतर हल्ली कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही अशी परिस्थिती सगळ्यांची निर्माण होते त्यामुळे आपण सगळेच जास्त सतर्क (How to alert in suspious situtions) असतो. 

Updated: Nov 10, 2022, 03:37 PM IST
आधी आपल्या प्रेमाला संपवलं, आता स्वत:लाच संपवलं... बातमी वाचून तुम्हालाही येईल चीड title=

सागर आव्हाड, झी मीडिया, औंध: हल्ली गुन्हेगारीच्या घटना (Maharashtra News) खूप जास्त वाढलेल्या दिसत आहेत. राज्यात अनेक भागात अशा घटना घडताना दिसतात त्यामुळे सध्या समाजात फार भितीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे सध्या अशा घटनांना आळा (Crime News in Pune) घालणं अत्यंत गरजेचे झालं आहे. सध्या अशीच एक घटना पुण्यात घडलेली दिसली आहे. या घटनेमुळे सध्या सगळ्यांना (Maharashtra Crime News) धक्का बसला आहे. खरंतर हल्ली कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही अशी परिस्थिती सगळ्यांची निर्माण होते त्यामुळे आपण सगळेच जास्त सतर्क (How to alert in suspious situtions) असतो. आपल्या कायमच असा प्रश्न पडतो आणि नक्की कुणावर विश्वास ठेवायचा आणि तोही का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहेत. (Accused Who Killed Young Girl Out Of One-Sided Love Died By Suicide In Aundh Pune Crime News)

एकतर्फी प्रेमातून (Love Affair) महाविद्यालयीन तरुणीचा खून केल्या प्रकरणातील आरोपी प्रतिक ढमाले याने मुळशी टाटा डॅम जवळ फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकारामुळे एकमेकांवर प्रेम असणारे प्रेमी युगुलाचा अंत झाला आहे. या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ (Videos) उडाली आहे. बुधवारी औंधमध्ये श्वेता रानवडे (वय 26, रा. ओैंध) या तरुणीचा खून झाला होता. श्वेता बहिणीसोबत दुपारी औंध जकात नाका परिसरातून जात होती. त्यावेळी प्रतिकने तिला अडवून चाकूने वार केले होते. त्यानंतर तो फरार झाला होता.प्रतिक ढमाले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने मुळशी धरण गळफास घेतला आहे. 

हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद

काय नेमकं घडलं? 

याबाबत प्राथमिक मिळालेली माहिती अशी की, संबधित तरुणाची एका विवाह समारंभात श्वेताशी ओळख झाली होती. तेव्हापासून तो तिला त्रास देत होता. पात्र त्याचे वर्तन चांगले असल्याने श्वेताने त्याला लग्नाला नकार दिला होता. त्याने हा राग मनात धरून श्वेताच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून तिचा खून केला होता.. त्यानंतर तो घतनस्थांवरून फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी चतुःश्रृंगी पोलिसांची पथके रवाना झाली होती. 

हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....

काय झालं पुढे... 

मात्र आज प्रतिक ढमाले या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुळशी ''टाटा डॅम''जवळ त्याने आत्महत्या केली. हे दोघेही नात्यातले असल्याची माहिती समोर आली असून या घटनेने औंध परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सूर आहे.