नांदेड : भाजपाने सुरु केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेवर अत्यंत बोचरी टीका केली. बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचा वाघ होता.
त्या वाघाची शेळी झाली, शेळीचा ससा झाला आणि त्या सशाचा आता कासव झाला ऐव्हढी वाईट अवस्था सेनेची झाल्याचे अजित पवार म्हणाले... डोळ्यासमोर शिवसेना आमदार फोडले जात असतांना सत्तेला लाथाडायची धमक देखील शिवसेना दाखवत नाही.
शेपूट घातलेल्या कुत्र्यासारखी त्यांची अवस्था झाल्याचे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा नांदेड मध्ये दाखल झाली. लोहा येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.