Crime News : अकोला (Akola News) शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अकोला शहर बसस्थानक परिसरात एका नराधमाने अंध्यत्वाचा फायदा घेत एका महिलेवर अत्याचार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिला आणि तिचा पती दोघेही अंध असून आरोपीने त्यांच्यासमोरच हे कृत्य केले आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सिव्हिल लाइन पोलिसांनी (Akola Police) या प्रकरणी आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
गुलाम रसुल शेख मतीन असे या आरोपीचे नाव असल्याचे समोर आले आहे. गुलामने बस स्थानकावर पत्ता विचारणाऱ्या अंध महिलेवर तिच्या अंध पतीसमोरच लैंगिक अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर आरोपी गुलामला सिव्हील लाईन पोलिसांनी अटक केली आहे. पती पत्नीच्या अंध्यत्वाचा फायदा घेत आरोपी गुलामने केलेल्या कृत्यामुळे सगळीकडेच संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हे दाम्पत्य अमरावतीहून त्यांच्या मुलीची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी मदतीच्या बहाण्याने नराधम गुलामने हे कृत्य केले. अंध पतीने आरोपीचा कसाबसा विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने त्याचा गळा दाबून बाजूला बसवले. त्यानंतर पीडित महिलेवर तीन वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अमरावती जिल्ह्यातील हे अंध दाम्पत्य अकोला जिल्ह्यातील दिग्रस येथे आपल्या मुलीला भेटण्यासाठी जात होते. मात्र रात्री बसस्थानकावर उशीर झाल्याने गुलामने त्यांची मदत करण्याच्या बहाण्याने दोघांना निर्जनस्थळी नेले आणि विवाहितेवर अत्याचार केला. बुधवारी दाम्पत्याने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
अकोला बसस्थानकवर उतल्यानंतर या दाम्पत्याला दिग्रजला जायचे होते. मात्र उशीर झाल्याने त्यांना एसटी मिळाली नाही. त्यांनी वाडेगाव बस स्थानकावर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र पाऊस सुरु झाल्याने त्यांनी रात्री रेल्वे स्थानकावर मुक्काम करण्याचे ठरवले. त्यावेळी पत्ता सांगण्याच्या बहाण्याने आरोपी गुलामने त्यांना अकोट फैल परिसरामध्ये नेलं. अंध्यत्वाचा फायदा घेत आरोपीने तीन वेळा अत्याचार केला. तुझा आणि तुझ्या पतीचा चाकू भोसकून खून करेन, अशी धमकी देत गुलामने महिलेला घाबरवं आणि तिच्यावर अत्याचार केला. बसस्थानकातून बाहेर पडताना गुलाम त्या दोघांना घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही दिसून आले.
त्यानंतर दाम्पत्याने सिव्हील लाईन पोलिसांत याबाबत तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य पाहता अकोला पोलिसांनी तपास सुरु केला विविध पुराव्यांच्या आधारे आरोपीला अटक केली आहे.