अमरावतीत बंदला का लागले हिंसक वळण, हे आहे कारण?

BJP bandh turns violent: त्रिपुरामधील घटनेच्‍या निषेधार्थ अमरावती जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात आला होता. यावेळी काही दुकानांची तोडफोड, दगडफेक करण्‍यात आली.

Updated: Nov 13, 2021, 02:30 PM IST
अमरावतीत बंदला का लागले हिंसक वळण, हे आहे कारण? title=

अमरावती : BJP bandh turns violent: त्रिपुरामधील घटनेच्‍या निषेधार्थ अमरावती जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात आला होता. यावेळी काही दुकानांची तोडफोड, दगडफेक करण्‍यात आली होती. भाजपने अमरावती बंदचे आवाहन केले होते. या बंदला हिंसक वळण लागले. इतवारा भागात आंदोलकांनी काही गाड्यांची तोडफोड केली. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हे होण्यासाठी पाठिमागचे कारण पुढे आले आहे.

त्रिपुरातील घटनेचा निषेध करण्यासाठी बंद पुकारण्यात आला होता. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले आहे. दगडफेक आणि तोडफोड जमावाकडून करण्यात आल्याने हिंसाचार उफाळला. त्यामुळे  अमरावती शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी दिले आहेत.

बंद पाळायला काही दुकानदारांचा विरोध

BJP bandh Violence : अमरावतीत जमाव बंदीचे आदेश जारी

अमरातवतीत बंदला हिंसक वळण लागल्याने चौकाचौकात आंदोलकांकडून दगडफेक केली. दुकानं बंद न केल्याने दुकानेही जाळली गेलीत. बंद पाळायला काही दुकानदारांनी विरोध केला. दुकाने बंद करण्यास काही दुकानदार तयार नव्हते. त्यामुळे जमाव संतप्त झाला. त्यानंतर दुकानांची तोडफोड करण्यात आली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

अमरावतीतल्या बंदत आंदोलकांकडून 4-5 दुकानांची जाळपोळ केली. दुकाने बंद केली नाहीत म्हणून दुकाने जाळली. राजकमल चौकात आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. यावेळी आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड केली. 

दंगल घडवून आणली - संजय राऊत 

महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटवण्यासाठी ही दंगल घडवून आणली आहे. दंगली घडवणं हा भाजपचा हातखंडा आहे. राज्य चालवता येत नाही म्हणून भाजपकडून दंगली घडविण्यात येत आहे, असा थेट आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, अमरावतीमध्ये दुकानं फोडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. दंगली घडवण्यामागे भाजपचा हात असल्याच्या संजय राऊतांच्या वक्तव्याचं त्यांनी खंडन कंले असून बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी राऊत यांच्या थोबाडीत मारली असती, असं ते म्हणालेत. 

नवनीत राणा यांचे जमावाला शांततेचे आवाहन

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले आहे. अमरावतीच्या पालकमंत्री  आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली.