Baba Siddique Shot Dead: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व येथे त्यांच्या कार्यालयाच्या बाहेरच तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. बाबा यांच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला. त्यातीलच एक गोळी त्यांच्या छातीत एक गोळी लागल्याने ते खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सुमारे 11च्या दरम्यान त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून एकाचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील आहेत. मुंबई पोलिस क्राइम ब्रँच या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. पोलिसांची चार पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांची पथके मुंबई बाहेर जाऊनही हत्येचा तपास करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तब्बल सात तास आरोपींची चौकशी करण्यात आली आहे.
धर्मराज आणि करनैल अशी दोन्ही आरोपींची नाव असून हरियाणा आणि उत्तर प्रदेश राज्यातील दोन्ही आरोपी आहेत. तर, एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी रात्री सात तास दोन्ही आरोपींची चौकशी करण्यात आली. आरोपींनी पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार, हल्ल्याच्या आधीच त्यांना अॅडव्हान्स पेमेंट करण्यात आले होते. तर, आरोपींनी बाबा सिद्दीकी यांचे कार्यालय ते घर अशी रेकी केली होती. तसंच, ते ज्या ठिकाणी फिरत होते वा ज्या परिसरात जात होती तिथली पण रेकी करण्यात आलेली होती.
बाबा सिद्दीकींवर हल्ल्याच्या आधीच्या रात्रीच आरोपींना बंदूक देण्यात आली असल्याचं त्यांनी कबूल केलं आहे. तिन्ही आरोपी हे दीड ते दोन महिन्याआधीपासूनच मुंबईत आले होते. तेव्हापासून त्यांनी सिद्दीकी यांची माहिती काढण्यास सुरुवात केली. तर, त्यांच्या घराचीही त्यांनी रेकी केली होती.
दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचे समोर आले आहे. सूत्रांनुसार, आरोपींनीही लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव घेतल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यासंबंधी अद्याप मुंबई पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकींवर गोळी झाडणारे आरोपींनी 2 सप्टेंबर रोजी कुर्ल्यात भाड्यावरती खोली घेतली होती. चार जण मिळून हे या रूममध्ये राहत असून या खोलीचे भाडे 14 हजार रुपये होते. पंजाब येथे जेलमध्ये असताना हे तिघेही आरोपी एकमेकांच्या संपर्कात होता. त्यातील आधीच एक जेलमध्ये असणारा आरोपी बिश्नोईशी संबंधित होता. तेव्हाच त्यांची ओळख झाली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट हा काही महिन्यांतच रचण्यात आला होता. एकूण चार जणांनी मिळून त्यांच्या हत्येची सुपारी घेतली होती. दीड लाख रुपये त्यांना देण्यात येणार होता. त्यातील प्रत्येकजण पन्नास हजार रुपये वाटून घेणार होते.