रत्नागिरी : सोशल मीडिया आज काळाची गरज बनला आहे, असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियाचे फायदे आहेत, त्याचप्रमाणे तोटे देखील आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक होते. अशीच एक घटना उघडकीस आली आहे रत्नागिरीमधून. सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचा फटका चक्क रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनाही बसला आहे. एका हॅकरने रत्नागिरीच्या जिल्हाधीकाऱ्यांचे फेसबूक अकाउंट हॅक केले आहे. एवढंच नाही तर जिल्हाधीकाऱ्याच्या खोट्या अकाउंटच्या माध्यमातून हॅकरने अनेकांकडे पैशांची मागणी केल्याचं उघड झालं आहे.
दरम्यान, ही गोष्ट लक्षात आल्यानंतर जिल्हाधीकारी डॉ.बी.एन पाटील यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. पैशांची मागणी करणारे मेसेज जर कोणाला आले तर त्यांनी तात्काळ पोलीस स्थानकात संपर्क साधावा. असं आवाहन करण्यात आलं आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यलयाकडून शनिवरी रात्री उशिरा माहिती देण्यात आली आहे.
संबंधित अज्ञात व्यक्तीने Collectorate Ratnagiri नावाने फेक अकाउंट तयार केलं आहे. ही व्यक्ती आता जिल्ह्यातील नागरिक, आधिकाऱ्यांनी फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठावून प्रकृती स्थिर नाही पैशांची गरज आहे... असं म्हणत पैशांची मागणी करत आहे. त्यामुळे जर तुम्हाला या नावाने रिक्वेस्ट आली तर सावधान...