नागपूर, औरंगाबाद : Rains in Maharashtra : नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विजेच्या कडकडाटांसह सकाळपासून पाऊस पडत आहे. पूर्व विदर्भात हवामान विभागातकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरणं, नदी दुथळी भरुन वाहू लागलेत. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चंद्रपुरात पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे. (Heavy rains in Chandrapur) आज सकाळपासून शहर जिल्ह्यात आकाश ढगाळलेले होते. अचानक पावसाला सुरुवात झाली. गेले तासभर मुसळधार पाऊस सुरू असल्याने रस्ते जलमय झाले. जिल्ह्यातील वार्षिक पावसाची टक्केवारी आता 87 टक्क्यांवर पोचली आहे. दमदार पावसाने शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. तर भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरात ढगफुटी झाली. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहरात तब्बल दोन तास मुसळधार पाऊस आल्याने जणू मोहाडी येथील रस्ते, नाल्या हे जलमय झाले होते.
भंडारामधील मोहाडी नगरपंचायत परिसरातील अनेक घरात, दुकानात पाणी शिरल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करवा लागला. तर जालना शहरात रात्री दीड तास मुसळधार पावसानं हजेरी लावली. 15 दिवसांपासून पावसानं दडी मारलेली. पण रात्री पावसानं दमदार हजेरी लावली. यामुळे शहरातली वाहतूक विस्कळीत झालेली. वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला.
चंद्रपुरात पावसाची मुसळधार हजेरी, मुसळधार पावसाने चंद्रपूर शहरातील दैनंदिनी विस्कळीत, आज सकाळपासून शहर जिल्ह्यात आकाश होते ढगाळलेले, गेले तासभर मुसळधार पावसाने रस्ते केले जलमय, कार्यालयात जाणाऱ्या नोकरदार वर्गाची सकाळच्या पावसाने केली पंचाईत, जिल्ह्यातील वार्षिक पावसाची टक्केवारी आता 87 टक्क्यांवर, मागील वर्षी या तारखेपर्यंत केवळ 63 टक्के पावसाची होती नोंद, दमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
विदर्भात पुढील दोन दिवस काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवलीय. नदीकाठावर राहणा-यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पूर्व विदर्भात आज सर्वत्र यलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय. नागपूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात पडणारा पाऊस व आजूबाजूच्या क्षेत्रातून धरणात येणा-या पाण्याचा आवकामुळे परिस्थिती लक्षात घेऊन मोठ्या धरणाचे दरवाजे कधीही उघडण्यात येवू शकतात. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील जरंडी मंडळात ढगफुटीसदृश पाऊस झाला. (Heavy rains in Aurangabad) घोसला, तिडका,अंजोला शिवारात रात्री तीन तास ढगफुटी सदृश पाऊस बरसत होता. या पावसानं अंजोला शिवारातील गट क्र-३९ मध्ये 14 मजूर पुराच्या पाण्यात अडकल्याने गोंधळ उडाला होता. ग्रामस्थांनी पुरातून या मजुरांना सुरक्षित स्थळी तिडका गावात हलविले. पावसामुळे पिकांची माती झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलंय. सोयगाव परिसरालाही दमदार पावसाने रात्री तडाखा दिला. यामध्ये बहुलखेडा, निंबायती,जरंडी, कंकराळा,आणि सोयगाव या भागात पावसाने हजेरी लावली.