कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी दोघांना अटक

कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी अॅडव्होकेट सुरेंद्र गडलिंग यांना पुणे पोलिसांनी अटक केलीय.

Updated: Jun 6, 2018, 08:37 AM IST

पुणे : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी अॅडव्होकेट सुरेंद्र गडलिंग यांना पुणे पोलिसांनी अटक केलीय. तसंच रिपब्लिकन पँथर्सचे कार्यकर्ते सुधीर ढवळे यांनाही अटक करण्यात आलीय. सुधीर ढवळे आणि इतरांनी पुढाकार घेऊन ३० डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातल्या शनिवार वाडा येथे एल्गार परिषद घेतली होती. या परिषदेच्या आयोजनाबाबत ८ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातल्या विश्राम बाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोहर भिडे गुरुजी यांना वाचवण्यासाठी सुधीर ढवळे यांना अटक करण्यात आल्याचा आरोप रिपब्लिकन पँथर्सच्या कार्यकर्त्यांनी केलाय. 

काय घडलं होतं?

१ जानेवारीला कोरेगाव भीमा गावातल्या भीमा कोरेगावच्या ऎतिहासिक लढाईच्या द्विशतक पूर्तीनमित्त भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंची गर्दी जमली असताना दंगल उसळली. काही समाजकंटकांनी जोरदार दगडफेक सुरू केली. नेमका त्याचवेळी काही कामानिमित्त रस्त्यावर आलेल्या याच गावातील राहुल फटांगडे या तरुणाला राहुलला दगड लागले. त्यात कोणत्याही गटाचा भाग नसलेल्या राहुलचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. भीमा कोरेगाव प्रकरणा मागे पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी तीन ते चार दिवस आधी चिथावणी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.