Maharashtra Politics : मराहाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार अशी बातमी समोर आली. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. एवंढच नाही तर उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Parishad Election) दिवशी शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते अशी माहिती सूत्रांनी दिलीय. (Big news in Maharashtra politics Uddhav Thackeray was not reachable for Sharad Pawar Uddhav Thackeray said maha vikas aghadi will leave)
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने त्यांचे 9 पैकी 9 उमेदवार जिंकून आलेत. महाविकास आघाडीचे 2 उमेदवार जिंकले, तर शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आणि अपक्ष उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटलांच्या या पराभवानंतर आरोप प्रत्यारोपाचा फेरी झाडल्या जात आहे. अशातच महाविकास आघाडीत पडद्यामागे खूप मोठी घडामोड घडल्याची सुत्रांकडून माहिती समोर आलीय.
ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे काँग्रेसच्या मतांच्या पाठिंब्याने विजयी झाले असले तरी मतदानाच्या दिवसापूर्वी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये पडद्यामागून बरेच राजकीय नाट्य रंगल होतं, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
विधान परिषद निकालानुसार, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना 22 प्रथम पसंतीच्या मतांनी विजय मिळवला. ज्यात काँग्रेसची 7 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आणि एक अपक्ष आमदार आहेत. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे नेत्यांना काँग्रेसकडून विश्वासार्ह मतांसाठी कठोर सौदेबाजी करावी लागली, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. कारण त्यांच्या प्रस्तावाच्या पहिल्या यादीत नावांचा समावेश होता त्यात फूट पडण्याची भीती होती. यात मोहनराव हंबर्डे, हिरामणी खोसकर, सुलभा खोडके, कुणाल पाटील आणि शिरीष चौधरी या काँग्रेस आमदारांच्या नावांचा समावेश होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावर काँग्रेस नेते दोन गटात पडले होते. पृथ्वीराज चव्हाण, बंटी पाटील, नसीम खान आणि नाना पटोले यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला आवश्यक सात मतांचा कोटा देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात NCP (SP) च्या बाजूने होते, ज्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवाराला धोका निर्माण झाला होता.
मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल देसाई, विनायक राऊत आणि वरुण सरदेसाई यांनी उघडपणे अविश्वास दाखवत या नावांना कडाडून विरोध झाला होता. खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेने पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, रुतुराज पाटील, अमित देशमुख, धीरज देशमुख आणि अस्लम शेख या 8 नावांची यादी दिली. 12 जुलैला मतदानाच्या आदल्या रात्री इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेनिथला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वादावादी झाल्याच सूत्रांनी सांगितलं. यानंतर प्रदेश काँग्रेस नेतृत्वाने प्रस्तावित केलेल्या नावांमध्ये बदल करण्यात आला.
अखेरीस नाना पटोले, के.सी. पाडवी, सुरेश वरपुडकर, शिरीष चौधरी, सहस्राम कोरोटे, मोहनराव हंबर्डे आणि हिरामण खोसकर या सात नावांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे समर्थनार्थ प्रस्ताव अंतिम करण्यात आला. त्यानंतर या बैठकीत निनाद पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांच्या विरोधात निंदनीय टिप्पणी केली. त्याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांचे काका जयंत पाटील यांच्या विरोधात कट रचल्याचा आरोप करण्यात आला.
या सगळ्या घडामोडीदरम्यान अचनाक राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि बैठकीत मध्यभागी सर्वांनी थोडावेळ विश्रांती घेतली. यामुळे विधानपरिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीचा निकाल त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गेल्यास मविआ सोडण्याची धमकी दिली, असं सूत्रांनी सांगितलं.
विशेष म्हणजे या सर्व उलथापाथल आणि वादावादीत शरद पवार यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक फोन केले. मात्र उद्धव ठाकरे हे नॉट रिचेबल होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. अखेरीस, काँग्रेस प्रदेश नेतृत्व देखील त्यांच्या असंतुष्ट आमदारांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरले. ज्यामुळे क्रॉस व्होटिंग झाली आणि मविआमध्ये जयंत पाटलांचा पराभव झाला