Maharashtra assembly Elections 2024 : महाराष्ट्रा विधानसबा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान पार पडेल तर 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा महानिकाल लागणार आहे. निवडणुका जाहीर होताच महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पहिलाच झटका महायुतीला बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर महायुतीतून बाहेर पडणार आहेत. महायुतीतून बाहेर पडम्याची घोषणा महादेव जानकर यांनी केली आहे. महादेव जानकर यांचा रासप पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. 288 मतदार संघाची चाचपणी करण्यात आलू असून लवकरच महादेव जानकर उमेदवरांची यादी करणार आहेत.
विधानसभेत रासपला 40 जागा महायुतीनं द्याव्यात, अन्यथा 288 जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी करत आहोत, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकरांनी महायुतीला दिला होता. तसंच जानकरांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केले होते.
महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात येतंय. महायुतीत मोठा भाऊ असलेला भाजप 158 जागा लढणार असं सांगण्यात येतंय. तर शिवसेनेला 70 आणि राष्ट्रवादीला 60 जागा देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. या जागावाटपात घटक पक्षांना कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे महादेव जानकर नाराज आहेत. भाजप महादवे जानकर यांची मधरणी करणार का? याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले आहे.