मुंबई: अमित शाह यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला पवारांच्या नातवाने प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट टाकून भाजपला डबल ढोलकीची उपमा दिलीय. अमित शाह यांनी सोलापूरमध्ये नुकत्याच झालेल्या सभेत शरद पवारांनी काय केलं, असा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न रोहित पवार यांच्या एवढा जिव्हारी लागला की त्यांनी थेट अमित शहांना लक्ष्य केले आहे.
गरज पडली तर साहेबांचा सल्ला घ्यायचा, गरज पडली तर बारामतीत येऊन साहेबांचं कौतुक करायचं आणि आणि निवडणूक आली की त्यांनी विचारायचं साहेबांनी काय केलं? भाजपचा असा डबल ढोल असतो. तो दोन्ही बाजूने वाजतो. पण आता बास झालं, असे रोहित यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
'...तर पवार-पृथ्वीराजच त्यांच्या पक्षात राहतील'; अमित शाहंचा निशाणा
गेल्या काही दिवसांत बड्या नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे शरद पवार पेचात सापडले आहेत. रोहित पवार यंदाच्या निवडणुकीतून राजकीय आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. पवार एकाकी असताना अशा वेळी भाजपावर टीका करुन रोहित पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे.
पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर शरद पवार संतप्त
दरम्यान, बड्या नेत्यांच्या पक्षांतरामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे असित्त्वच धोक्यात येण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादीला ४१ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, भाजपचा सध्याचा झंझावात पाहता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात भाजपला १६० तर महायुतीला २८८ पैकी २२९ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.