'मुख्यमंत्र्यांचा काय संबंध, अजित पवारांनीच....', धनंजय मुंडेंचा उल्लेख करत सुरेश धस स्पष्टच बोलले, 'आकाचा आका...'

Suresh Dhas on Dhananjay Munde Resignation: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी भाष्य केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 28, 2025, 05:34 PM IST
'मुख्यमंत्र्यांचा काय संबंध, अजित पवारांनीच....', धनंजय मुंडेंचा उल्लेख करत सुरेश धस स्पष्टच बोलले, 'आकाचा आका...' title=

Suresh Dhas on Dhananjay Munde Resignation: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही तर मी कोर्टात जाईन असा इशाराही त्यांनी दिला आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी यावर भाष्य केलं असून मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नसून, अजित पवारच निर्णय घेतील असं म्हटलं आहे. आमचं जरा लांबचं नात आहे. आम्ही भाजपाचे आहोत असंही ते उपहासात्मकपणे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मुंबईत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

'45 कोटी, राखेचे साठे अन् करुणा मुंडे...'; मुख्यमंत्री भेटीत सुरेश धस यांचे गौप्यस्फोट; केल्या 6 मोठ्या मागण्या

 

मुख्यमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "अजित पवार निर्णय घेतील, त्यांनीच निर्णय घ्यावा. या प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा काय संबंध?आमच्या पक्षाचे ते नाही आहेत. त्यांचा राजीनामा आम्ही घेऊ शकत नाही. त्यांच्या पक्षाचेच आमदार राजीनामा घेतला जावा म्हणत आहेत. पण अजित पवार घेत नाहीत. अजित पवारांनी घ्यायचं की नाही ठरवायचं आहे. आमचं जरा लांबचं नात आहे. आम्ही भाजपाचे आहोत". वाल्मिक कराड भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चांवर ते म्हणाले की, भाजपावर इतकी वाईट वेळ आलेली नाही. मी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

'तुमचा बाप इथं बसलाय...', वाल्मिक कराडची पोलीस अधिकाऱ्यासोबतची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

 

पुढे ते म्हणाले की, "पंकजा मुंडे यांनी यावर्षीच्या भगवान भक्तीगडाच्या दसरा मेळाव्यात एक वाक्य वापरलं होतं. ज्यांच्याशिवाय धनंजड मुंडेचं पान हालत नाही ते वाल्मिक कराड अण्णा हे त्यांचं वाक्य काढून ठेवा.  आजचा फोन जो झाला आहे तो अतिशय भयानक प्ररकरणातील आहे. ते पानही धनंजय मुंडेंशिवाय हललंय की नाही हे मला पाहायचं आहे".

"वाल्मिक अण्णा म्हणजे जिल्ह्यात एकच अण्णा आहे. एकच आका आणि दुसरा आकाचा आका आहे. तुम्हाला या क्लिपचं गांभीर्य माहिती नाही. त्या महिला अधिकारी कोण आहेत ज्यांना आकाने फोन केला, कोण तो आरोपी आहे. किरकोळ केस आहे असं कोण म्हणालं?हे प्रकरण काय आहे, त्या अधिकारी कोण हे मीडियानेच बाहेर आणावं," असं ते व्हायरल कथित ऑडिओवर म्हणाले आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x