जत नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर'

सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. जतमध्ये ६८ टक्केहुन अधिक मतदान झालं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 11, 2017, 11:46 AM IST
जत नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर'

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. जतमध्ये ६८ टक्केहुन अधिक मतदान झालं आहे.

भाजप-काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर

२० नगरसेवक पदाच्या जागेसाठी ७६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर थेट नगराध्यक्षपदासाठी ४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मात्र नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी प्रमुख लढत ही काँग्रेसच्या उमेदवार शुभांगी बन्नेनवार विरोधात भाजपच्या उमेदवार डॉ. रेणुका अरळी यांच्यातच आहे.

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी स्वबळावर

भाजप आणि काँग्रेसमध्ये अत्यंत कांटे की टक्कर सुरू आहे. जत नगरपरिषदेसाठी प्रमुख लढत ही भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जत नगरपरिषदेत मागील वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि भाजप हे स्वबळावर लढत असल्याने चुरशीची निवडणूक होत आहे.

बातमीचा व्हिडिओ