चंद्रपूर : वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वायगाव हळद्या परिसरात दोन मृतदेह सापडल्याने खळबळ पसरली.
वायगाव येथील हालाद कंपनीच्या परिसरात हे मृतदेह आढळल्याने नागरिकांनी याची माहिती संबंधित पोलीस विभागाला दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून प्रकरणाची चौकशी सुरु केली. समुद्रपूर पोलीस स्टेशन हद्दीत मिळालेल्या या मृतदेहांची आणि परिसराची चौकशी केली असता, दोघेही प्रेमी युगल असून हे चंद्रपूरचे राहणारे असल्याचे समोर आले. घरच्यांचा प्रेमाला विरोध झाल्याने दोघांनी घरून पळून जावून वायगाव येथील हळद कंपनीच्या परिसरात दोघांनीही सोबतच विष प्राशन करुन मृत्यूला कवटाळले.
दोघांनी विषारी औषधी सेवन करून आत्महत्या केले असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी सुसाईट नोट मिळाल्याने हे प्रकरण उघड झाले. प्रेमी युगलात मृतक विनोद मुकरूजी गडेकर(२५) राहणार मूल जिल्हा चंद्रपूर आणि संगीता दाबले(१८) राहणार आष्ठा तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असल्याचे त्यांच्या खिशात असलेल्या आधार कार्ड वरून समजले.
दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले असून पुढील तपास सुरू आहे.