Chandrapur Crime News : पोलिसांनी पुरलेला मृतदेह कबरीतून बाहेर काढला आहे. चंद्रपूरमध्ये अतिशय खळबळजनक घटना घडली आहे. अत्यंविधी झाल्यानंतर अचानक चार दिवसानंतर पोलिस मृत मुलाच्या घरी दाखल झाले. पोलिसांना पाहून सगळेत शॉक झाले. या सर्व प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत आहेत.
चंद्रपूर शहरातील बगड खिडकी या भागात अल्पवयीन मुलांच्या भांडणामध्ये एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. क्रिकेट खेळत असताना भांडण विकोपाला गेले आणि एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यावर बॅटने वार केला. जखमी मुलाला तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ही घटना चार दिवसा आधी घडली होती. विशेष म्हणजे दोन्ही कुटुंबानी आपसी समझोता करून मृत मुलाचा दफनविधी केला. दरम्यान, या संदर्भात पोलिसाना गुप्त माहिती मिळाली. त्यांनी पुरलेले शव कब्रस्तान मधून बाहेर काढून पोस्टमार्टमला पाठविले. सध्या अज्ञात आरोपीवर हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
विरार पूर्वेच्या पापडखिंड परिसरातील डोंगरावर असलेल्या बारोंडा देवी मंदिरात चोरी झाली. चोरट्यांनी मंदीराच्या दानपेटीवर डल्ला मारला. खिडकी तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला आणि दानपेटी पळवत इतर सामानाची चोरी केलीये. यावेळी चोरांनी सीसीटिव्हीचा डीव्हीआरही पळवलाय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.
मुलुंडचे आमदार मिहिर कोटेच्या यांची खोटी कागदपत्र वापरुन सरकारी दस्तावेज बनविणा-यां 13जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलुंड आणि बदलापूर परिसरातील विभूती मस्के आणि सिराज अन्सारी या दोन एजंट कडून पॅनकार्ड मध्ये दुरुस्ती करण्यासाठी आमदारांची बोगस स्वाक्षरी स्टॅम्प आणि आय कार्ड वापरले जात होते.
येवला तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला 3 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडलंय. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केलीय. पोलीस स्थानकात दखलपात्र गुन्हा दाखल न करण्याचे मोबदल्यात ही लाच घेण्यात आली होती.