भुजबळ निर्दोष आहेत : खासदार सुप्रिया सुळे

दिलीप कांबळे यांच्या विधानाचे स्वागत आहे, किमान आता त्यांना तरी कळाले की भुजबळ निर्दोष आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 29, 2017, 11:22 PM IST
भुजबळ निर्दोष आहेत : खासदार सुप्रिया सुळे title=

पुणे : दिलीप कांबळे यांच्या विधानाचे स्वागत आहे, किमान आता त्यांना तरी कळाले की भुजबळ निर्दोष आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

काल पुण्यात एका कार्यक्रमात सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी त्यावेळी भुजबळांसारखा लढवय्या नेता तुरूंगातून बाहेर यायला हवा, असं धक्कादायक वक्तव्य केलं होतं. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतिने भुजबळ निर्दोष असल्याचे यापुर्वी दावे करण्यात येत होते. कांबळे यांच्या वक्तव्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.