Maharashtra Politics : राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सूचक संकेत

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, शिवतीर्थावरील भेटीमागचं कारण गुलदस्त्यात असले तरी प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी सूचक संकेत दिले आहेत. 

Maharashtra Politics : राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सूचक संकेत

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मालेगावात उद्धव ठाकरे यांची सभा सुरु असतानाच मुंबईत एक अत्यंत महत्वाची  आणि मोठी राजकीय घडामोड घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेच्या आंदोलनांबबात सूचक संकेत दिले आहेत (CM Eknath Shinde met Raj Thackeray). 

राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट झाली. मशिदीवरच्या अनधिकृत भोंग्यांबद्दल भेटीत चर्चा झाली. यावेळी भोंगे प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सूचक संकेत दिले आहेत.

राज ठाकरे यांच्यासोबत भेट झाली. या भेटीत  निवडणुकांबाबत कोणतेही चर्चा जालेली नाही.  मशिदी वरील भोंगे याबाबत चर्चा झाली. नियमानुसार काय ते केले जाईल.  मनसे कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते तपासून घेतले जातील. कोणावरही अन्याय करणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.  हे सर्वसामान्यांचे सरकार आहे.  उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ मी सभा घेत नाही तर विकासाच्या मुद्द्यावरती बोलतोय आणि कामच करतोय. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर योग्यवेळी बोलेल असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 

 

शिंदे गट आणि मनसे यांच्याती जवळीक वाढतेय

यापूर्वी 2022 मध्ये राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असताना राजकीय गुलालही उधळला गेला होता. बाप्पाच्या दर्शाच्या निमित्तानं राजकीय भेटीगाठींचा मोठा सिलसीला पहायला मिळाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. शिवसेनेमधलं आजवरचं सर्वात मोठं बंड यशस्वी केल्यानंतर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे आणि राज ठाकरेंची ही पहिलीच भेट होती. त्यात मुंबईसह राज्यभरातील महापालिका निवडणुका यामुळे ही भेट चांगलीच चर्चेत आली होती. यानंतर कधी सेल्फी पॉइंटचे उद्घाटन असो की दुसरं काही असो महराष्ट्रातील या दोन नेत्यांमध्ये सातत्याने भेटी गाठी होत आहेत. यामुळे शिंदे गट आणि मनसे यांच्याती जवळीक वाढत आहे.