नांदेड : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नांदेडमध्ये होते. दुपारी एकच्या सुमारास त्यांचं नांदेड विमानतळावर आगमन झालं. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह राहुल गांधींनी अर्धा तास चर्चा केली.
मात्र राहुल गांधी आणि अशोक चव्हाण यांच्या चर्चेचा तपशील कळू शकलेला नाही. विमानतळावरच राहुल गांधींनी दुपारचं जेवण केलं. त्यानंतर हेलिकॉप्टरने राहुल गांधी तेलंगणाकडे रवाना झाले.