नवी मुंबईतील गंभीर गुन्ह्यातील आरोपी- पोलिसांची चकमक

नवी मुंबई पोलीस आणि गंभीर गुन्‍हयातील आरोपींमध्‍ये खालापूरजवळ चकमक झाली. 

Updated: Oct 20, 2018, 10:30 PM IST
नवी मुंबईतील गंभीर गुन्ह्यातील आरोपी- पोलिसांची चकमक title=

रायगड : नवी मुंबई पोलीस आणि गंभीर गुन्‍हयातील आरोपींमध्‍ये खालापूरजवळ चकमक झाली. खारघरमध्ये चोरीचे दोन गुन्‍हे करून चोरीच्‍या गाडीतून हे तीन आरोपी रायगडच्‍या दिशेने निघाले. पोलीस आरोपींचा पाठलाग करत असताना ते मुंबई - पुणे महामार्गावरील नढाळमधील आदिवासी वाडीवर लपून राहिल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस त्याठिकाणी पाहोचताच आरोपींनी पोलीसांवर गोळीबार केला. 

पोलिसांनी प्रत्‍युत्‍तरादाखल केलेल्‍या गोळीबारात फैययाज शेख आणि त्‍याचा साथीदार सलीम शेख हे दोघे जखमी झाले. जखमी अवस्‍थेत ते पळून जात असताना पोलीसांनी त्‍यांना पकडलं. त्यानंतर तातडीनं उपचारासाठी कामोठेमधील एमजीएम रूग्‍णालयात दाखल करण्यात आलंय. त्‍यांचा आणखी एक साथीदार सखाराम पवार यालाही पोलिसांनी ताब्‍यात घेतलंय. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x