नागपूर : Nagpur Crime News : Minor girl gan raped by 9 people : एका अल्पवयीन अकरा वर्षीय बालिकेवर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी आठव्या वर्गात शिकते. यातील एका आरोपीला ती ओळखत होती. एक काम आहे, असे सांगतून या आरोपीने तिला घरी नेले. यावेळी दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला काही सांगितलेस तर जीवे मारण्याची धमकी दिली. तिच्यावर अन्य काही जणांकडूनही अत्याचार करण्यात येत होता आणि तिला धमकावले जात होते. अखेर याप्रकरणाला वाचा फुटली. पोलिसांनी याप्रकरणी नऊ जणांना अटक केली आहे.
रोशन कारगावकर(29 ), गजानन मुरस्कर (40 ), प्रेमदास गाठीबांधे, गोविंदा नटे, सौरभ रिठे, नितेश फुकट, राकेश महाकाळकर, प्रद्युम्न करुटकर, निखिल नरुले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
काय आहे हे प्रकरण...
पीडित अल्पवयीन मुलगी आठवी इयत्तेत शिकत आहे. ती आरोपी रोशनला ओळख होती.19 जूनला रोशन आणि गजानन मुलीच्या घरी आले. तू आमच्या घरी चल, तुला एक काम सांगतो असे म्हणून रोशन पीडितेला आपल्या घरी घेऊन गेला. तिथे दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर अत्याचाराबाबत कोणास सांगितल्यास तुला ठार मारू अशी धमकी पीडितेला दिली. अत्याचार केल्यानंतर पीडितेला 300रुपये दिले. हे पैसे सापडले आहे, असे घरच्यांना सांग असेही बजावले.
आरोपी रोशनने अत्याचार केल्यानंतर पीडीतेला अजून काही लोक येणार आहेत, त्यांनाही तू असेच करु दे तुला पैसे देतील, असे धमकी देत सांगितले. त्यानंतर अजून तीन नराधमांनी या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. रोशनने वेळोवेळी या मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर आरोपी गजानन तुझ्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्याची धमकी देत अजून काही लोकांसोबत पीडितेचेचे शारीरिक शोषण केले.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. याप्रकरणी उमरेडमध्ये प्रचंड असा संताप आहे. रोशन हा एका हत्याकांडातील आरोपी आहे. पोलीस कोठडीत त्यांनी अत्याचाराची कबुली दिली. दरम्यान ग्रामीण पोलीस याप्रकरणी आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास करत आहेत.