सत्ताधारी शिवसेनेवर फडणवीस यांची पुन्हा तोफ, 'सत्तेची गुर्मी चढलेय!'

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी शिवसेनेवर पुन्हा तोफ डागली.

Updated: Jan 25, 2020, 04:27 PM IST
सत्ताधारी शिवसेनेवर फडणवीस यांची पुन्हा तोफ, 'सत्तेची गुर्मी चढलेय!' title=
संग्रहित छाया

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी शिवसेनेवर पुन्हा तोफ डागलीय. काही लोकांच्या मनात सत्तेची गुर्मी चढली आहे. त्यांचा रंग बदलला आहे. रंग बदलला नसेल तर सीएएला समर्थन करा आणि सावरकरांच्या बाजूने या, असे आव्हान फडणवीस यांनी दिले आहे. नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते.

गडकरींची शिवसेनेवर टीका

महाराष्ट्रात आपले राज्य येउ शकले नाही. जिल्हा परिषदेत अपेक्षित यश मिळाले नाही. मला असं वाटत की या ज्या निवडणुका झाल्या त्यात विधानसभा निवडणुकीत आपल्याला यश मिळाल. या निवडणुका आपण भाजप-शिवसेना आणि मित्र एकत्र लढलो. १०५ जागा भाजपला मिळाल्या शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. त्यामुळे आपल्याला युती म्हणून निर्विवाद बहुमत मिळाले. त्यामुळे  आपला पराभव झालं असं कोणी म्हणत असेल तर ते मला मान्य नाही. मात्र मिळलेल्या यशनानंतर 
निवडणूक लढत असताना आपल्या सोबत लढणाऱ्यांनी निवडणूक झाल्यानंतर आपला साथ सोडून दिली. विचारांशी एकप्रकारे विश्वासघात करत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती केली. त्यामुळे आपल्याला पराजय मिळाला  नाही, मात्र विश्वासघात मिळाला. निवडणुकीत जय पराजय होत असतात. एक पार्टी म्हणून आपण नागपुरात ताकतवर आहोत.  आपला पक्ष लोकशाही पक्ष आहे.. ज्या पक्षात निवडणुकाच होत नाही. तो  पक्ष लोकशाहीद्वारे कसा हा प्रश्न आपल्यासमोर आहे. आपला पक्ष कार्यकर्त्यांचा. आपल्या पक्षात मुलगा, पत्नी म्हणून पद मिळत नाही
या पक्षाचे मालक कार्यकर्ते आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली