धनंजय मुंडेंची सरकारवर टीका, आरोपही फेटाळले

 गणेशोत्सव कार्यक्रमात सरकारवर हल्लाबोल

Updated: Sep 14, 2018, 10:36 AM IST
धनंजय मुंडेंची सरकारवर टीका, आरोपही फेटाळले

बीड : विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमात सरकारवर हल्लाबोल केला आहे. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आणि बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलच्या हस्ते परळीत गणेश फेस्टिव्हलचं उदघाटन करण्यात आलं. यावेळी मुंडे यांनी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा केला. न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. कारण आपण सरकारवर टीका करतो. मात्र अशा आरोपामुळे माझी टीका कमी होणार नाही. गणपती बाप्पा सरकारला महागाई, भ्रष्टाचार कमी करण्याची सदबुद्धी देवो अशी प्रार्थना असं यावेळी मुंडे यांनी म्हटलं.

संत जगमित्र सूत गिरणीच्या थकीत कर्ज प्रकरणात मुंडे यांच्यासह सर्व संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश अंबाजोगाई न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळं धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसला आहे. 

3 कोटींच्या वसुलीसाठी धनंजय मुंडे यांचं घर, सूतगिरणीचं कार्यालय आणि इतर मालमत्ताचा यापुढे व्यवहार करता येणार नाही असे आदेश न्यायलयाने दिले आहेत. या गैरव्यवहार प्रकरणी धनंजय मुंडे यांचं देशमुख टाकळी, कौडगाव, जलालपूर येथील शेती आणि अंबाजोगाई रोडवरील घर आणि जगमित्र सूतगिरणीच्या ऑफिसच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.