एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार? फडणवीस यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचा मोठा खुलासा

महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत X हँडलवरील व्हिडियोमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. 2 तासांनंतर भाजपकडून ट्विट डिलीट करण्यात आले आहे. 

Updated: Oct 27, 2023, 09:39 PM IST
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार? फडणवीस यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचा मोठा खुलासा title=

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणाच खळबळ उडवणारी घडामोड घडली आहे. महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत X हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले.एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार? अशी देखील चर्चा रंगली. भाजपने मुख्यमंत्री पदाच्या या चर्चेबाबत मोठा खुलासा केला आहे. 

भाजपचा व्हिडिओ व्हायरल 

महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत X हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली. महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत X हँडलवरील व्हिडियोमुळे राजकारणात खळबळ उडाली.  

महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी पुन्हा येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. यामुळेच देंवेद्र फडणविस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा रंगली. दोन दिवसांपुर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणविस यांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. लोकसभा निवडणूकीसाठी भाजपाची नवी रणनिती असल्याचे देखील बोलले जात होते.

महाराष्ट्र भाजपकडून फडणवीसांच्या व्हिडीओवर खुलासा

फडणवीस यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला. यानंतर महाराष्ट्र भाजपकडून फडणवीसांच्या व्हिडीओवर खुलासा करण्यात आला.  जनादेश यात्रेतील हा व्हिडीओ आता पर्यंत अनेकदा शेअर करण्यात आला आहे. त्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असते. या आधीच माननीय देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढविल्या जातील. त्यामुळे कुणीही वेगळा अर्थ काढू नये. हा व्हिडीओ सोशल मीडियापुरता मर्यादित आहे असे स्पष्टीकरण भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिले आहे.  भाजपकडून दोन तासांनंतर फडणवीसांसंबंधीचे ट्विट डिलीट करण्यात आले.