मुंबई : मराठवाड्यात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यामध्ये आत्महत्यांचं सत्र सुरू झाले आहे. पिंपरी देशमुख ह्या गावातील भानुदास आवकाळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे 3 लाखांचे कर्ज होते. वाढता कर्जाचा डोंगर आणि शेतातील नापिकी ह्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून ताडकळस पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय.