यवतमाळ: स्वत:च्या हाताने चिता रचून शेतकऱ्याची आत्महत्या

रावते यांच्यावर स्टेट बँकेचे 60 हजारांचे कर्ज असल्याने ते चिंताग्रस्त होते.  अशात ते शेतात गेले आणि तुऱ्हाटी च्या गंजीची चिता रचून ती पेटवली आणि या आगीत त्यांनी स्वतःला झोकून देत आत्महत्या केली.

Updated: Apr 17, 2018, 05:19 PM IST
यवतमाळ: स्वत:च्या हाताने चिता रचून शेतकऱ्याची आत्महत्या title=

यवतमाळ : सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील आणखी एका शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलंय. उमरखेड तालुक्यातल्या या शेतक-यानं थेट चिता रचून स्वत:ला झोकून दिलं.  माधव रावते असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या वृद्ध शेतकऱ्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. सततच्या नापिकीमुळे ते निराश होते. यावर्षी बोंडअळीमुळे त्यांना केवळ तीन क्विंटल कापूस झाला होता. त्यामुळे ते आर्थिक संकटात होते.

६० हजार रूपयांचे होते कर्ज

रावते यांच्यावर स्टेट बँकेचे 60 हजारांचे कर्ज असल्याने ते चिंताग्रस्त होते.  अशात ते शेतात गेले आणि तुऱ्हाटी च्या गंजीची चिता रचून ती पेटवली आणि या आगीत त्यांनी स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. यवतमाळ जिल्ह्यातल्या राजूरवाडीत शंकर चायरे या शेतक-यानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावानं चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. त्या घटनेला आठवडा उलटण्यापूर्वीच ही धक्कादायक घटना घडली आहे. बिटरगाव पोलीस स्टेशनअंतर्गत सावळेश्वर हे दुर्गम गाव येतं. दोन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना उघडकीस येताच राज्यभर या घटनेची चर्चा सुरू झालीय

यवतमाळमधील गावकऱ्यांनी राष्ट्रपती आणि राज्यपालांना पत्र पाठविण्याची मोहीम

दरम्यान, यवतमाळमधील राजूरवाडीतल्या गावक-यांनी राष्ट्रपती आणि राज्यपालांना पत्र पाठवण्याची मोहीम सुरु केलीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नेरंद्र मोदी यांचा निषेध करणारे एक लाख पत्र पाठवणार असल्याचं यवतमाळच्या ग्रामस्तांनी ठरवलंय. यवतमाळ जिल्ह्यातली ही राजूरवाडी.. इथले ग्रामस्थ राष्ट्रपती आणि राज्यपालांना पत्र लिहिण्यात व्यस्त आहेत.  बोंडअळीनं झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्यानं या गावातल्या शंकर चारयरे या शेतक-यांनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरत आत्महत्या केली.. त्यानंतर चायरे कुटुंबियांनी पंतप्रधान नरेद्र मोदीं विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली.. मात्र तक्रार दाखल करण्यात आलीच नाही. शिवाय मुख्यमंत्र्यांनीही या कुटुंबला भेट देणं टळलं.. तीन दिवस शेतक-याचा मृतदेह शवागरात पडून होता. त्यामुळे शेतक-याच्या मुलीनं पंतप्रधानांचा निषेद करत थेट राष्ट्रपती आणि राज्यपालांना पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला.