नांदेड : एक धक्कादायक घटना. एकाच कुटुंबातल्या पाच जणांची धबधब्यात उडी घेत आत्महत्या केली. मालमत्तेच्या वादातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन मुलींच्या मृतदेहाचा शोध सुरूच आहे. ही हुदयद्रावक घटना हदगाव तालुक्यात घडली. कवानकर कुटुंबातील सदस्यांना आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला.
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातल्या पाच जणांची धबधब्यात उडी घेत आत्महत्या । मालमत्तेच्या वादातून आत्महत्येचा संशय । दोन मुलींच्या मृतदेहाचा शोध सुरू । हदगाव तालुक्यातील कवानकर कुटुंबातील सदस्य@ashish_jadhaohttps://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/SuSRsVhicI
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 2, 2020
हदगाव तालुक्यातील कवानकर कुटुंबातील पाच सदस्यानी सहस्त्रकुंड धबधब्यावरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हदगाव येथील प्रवीण कवानकर (४० वर्षे), त्याची पत्नी अश्विनी (३८), मुलगी (२०) सेजल, मुलगी समीक्षा (१४), मुलगा सिद्धेश (१३) यांनी सहस्त्रकुंड धबधब्यात उडी घेत आत्महत्या केली. बुधवारी कवानकर कुटुंब आपल्या गाडीतून यवतमाळ जिल्ह्याच्या दिशेने असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबब्यावर गेले होते.
गुरुवारी यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीतील पैनगंगा नदीच्या पात्रात अश्विनी कवानकर आणि मुलगा सिद्धेश याचा मृतदेह आढळला. तर प्रवीण कवानकर यांचा मृतदेह नांदेड जिल्ह्याच्या बाजूने इस्लापूर हद्दीत आढळला. समीक्षा आणि सेजल या दोघीचा मृतदेह अजून सापडलेला नाही. दरम्यान कवानकर कटुंबियांचे हदगाव येथे मोठे किराना दुकान आहे. कौटुंबिक किंवा भावासोबत असलेल्या मालमत्तेच्या वादातून या कुटुंबाने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.
6\