मोर्णा नदीला पूर, घरात पाणी शिरल्याने लोकांना रेस्क्यू टीमने काढले बाहेर

 मोर्णा नदीला पूर  आल्याने मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. (Flooded Akola, Flood Rescue Operation) घरात पाणी शिरल्याने नागरिक अडकले होते.  

Updated: Jul 22, 2021, 01:31 PM IST
मोर्णा नदीला पूर, घरात पाणी शिरल्याने लोकांना रेस्क्यू टीमने काढले बाहेर  title=

अकोला : शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला पूर  आल्याने मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. (Flooded Akola, Flood Rescue Operation) घरात पाणी शिरल्याने नागरिक अडकले होते. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी रेस्क्यू टीमची मदत घेण्यात आली. मोर्णा आणि विद्रुपा नदीच्या संगम स्थळी असलेल्या न्यू खेतान नगर येथील सुमारे 50 घरात पुराचं पाणी शिरले होते. 

तसेच शहरातील अनिकट, कौलखेड,एमराल्ड कॉलोनी ,खोलेश्वरच्या सखोल भागात पुराचं पाणी शिरलं..या पुरात अडकलेल्या नागरिकांचा बचाव कार्य प्रशासनाने सुरू केले. तर पुराच्या पाण्यात सुमारे 150 घरे पाण्यात बुडाली  असून वेळीच लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. अचानक आलेल्या मोर्णा नदीच्या पुरामुळे लोकांमध्ये एकच धावपळ झाली.

गेल्या पंधरा वर्षातला हा सर्वात मोठा पूर असल्याचं येथील नागरिकांनी म्हटले आहे. दरम्यान नागरिकांना पुराचा कोणताही अंदाज प्रशासनाने दिला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे तर बचावासाठी आणलेली बोटमध्येच बंद पडली. यामुळे रेस्क्यू टीमलाच रेस्क्यू करण्याची वेळ आली होती. सध्या पावसाने विश्राती घेतली आहे. तर पुढच्या 48 सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 202 मी.मी पावसाची नोंद झाली.