Gold Mine: चंद्रपूरनंतर आता कोकणातील 'या' जिल्ह्यातही भूगर्भात सोने?, खनिकर्म विभागाची चाचपणी

Gold Mine In Sindhudurg : चंद्रपुरात सोन्याच्या (Gold) दोन खाणी असल्याचा केंद्रीय खनीकर्म विभागाचा अहवाल समोर आला आहे. तसेच सिंधुदुर्गातही सोन्याच्या खाणींसाठी चाचणी सुरु आहे.

Updated: Dec 2, 2022, 11:57 AM IST
Gold Mine: चंद्रपूरनंतर आता कोकणातील 'या' जिल्ह्यातही भूगर्भात सोने?, खनिकर्म विभागाची चाचपणी

Gold Mine In Chandrpur : आता आणखी एक मोठी बातमी. चंद्रपूर, सिंधुदुर्गात सोन्याच्या खाणी (Gold Mine) असल्याचं उघड झाले आहे. राज्याच्या भूगर्भात कोळसा, बॉक्साईट, लोह या खनिजासह सोनंही दडलं असल्याची माहिती उघड झालीय. चंद्रपूर (Chandrpur) जिल्ह्यात मिंझरी आणि बामणी या भागात सोन्याचे दोन ब्लॉक आढळले आहेत. (Maharashtra News in Marathi) तसंच या भागात तांबही असून मोठ्या प्रमाणात सोनं मिळू शकतं असा अहवाल केंद्राच्या खनिकर्म विभागाने दिलाय. दुसरीकडे कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातही भूगर्भात सोनं असल्याची शक्यता आहे. त्यासाठी चाचणी सुरु झालीय. 

दरम्यान, चंद्रपूर येथील गोंडपिपरी तालुक्याच्या भूगर्भात मौल्यवान प्लॅटिनम, सोने आणि दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रुथेनियम, रेडिअम, इरेडिअम धातू असल्याचे 10 वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून समोर आलेय. आता सोने खाणीचे ब्लॉक सापडल्याने याला अधिक दुजोरा मिळाला आहे.  

राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरु करुन सोने खान व्यवसायातील अडचणी दूर करुन राज्याच्या महसूलात वाढ होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात दिले होते. राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत. राज्यात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

आमच्या सरकारच्या काळात हे सोने बाहेर निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी संधी असेल. राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरु करु शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलाय.