दारूच्या नशेत जावयाने लावली सासऱ्याच्या घराला आग, लोकांनी पाहताच झाला पसार

Gondia Crime : गोंदियात दारुड्या जावयाने सासऱ्यांच्या गाडीला आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Pravin Dabholkar | Updated: Sep 29, 2023, 02:32 PM IST
दारूच्या नशेत जावयाने लावली सासऱ्याच्या घराला आग, लोकांनी पाहताच झाला पसार title=

प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : जावयाने आपल्या सासऱ्यांची वडिलांप्रमाणे काळजी घेणे अपेक्षित असते. पोटची मुलगी दिल्याने सासऱ्यांच्याही जावयाकडून अपेक्षा असतात. जावई आणि सासऱ्यांचे नाते अनेकदा चर्चेचा विषय बनलेले पाहायला मिळते. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आला आहे. येथे एक जावई आपल्या सासऱ्याच्या जिवावर उठल्याचे दिसून आले आहे. काय आहे ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

गोंदीयातील डवकी गावात जावयानेच आपल्या सासरच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये दोन मोटरसायकल जळून खाक झाल्या आहेत. तर आगीत सासऱ्यांच्या घराचे छत जळाले आहे. सनकी जवायाने सासऱ्याचे घर जाळण्याचा प्रयत्न केल्याने जावयाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. नितेश मधुकर शहारे असे जावयाचे नाव आहे. तर  शंकर राऊत असे सासऱ्यांचे नाव आहे. 

डवकी येथे राहणारे सासरे शंकर राऊत हे त्यांच्या परिवारातील सदस्यांसह रात्री झोपी गेले होते. यावेळी रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर अचानक स्फोट झाल्याचा आवाज आला. हा आवाज येताच घरच्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले. काय घडले हे पाहायला शंकर राऊत घराबाहेर आले. घराबाहेरचा प्रकार पाहून शंकर यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या घरा समोर ठेवलेल्या दोन मोटरसायकल जळताना दिसत होत्या. एवढेच नव्हे तर ही आग इतकी भीषण होती की घराच्या समोरील छतास आग लागल्याचे त्यांना दिसत होते. 

आग लागल्याचे पाहतात सासरे शंकर आणि त्यांच्या घरच्यांनी आरडा - ओरडा सुरु केला. आवाज ऐकून नागरीकानी आग विजवली. दरम्यान जावई नितेश मधुकर शहारे हा बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन उभा असल्याचे निदर्शनास आले. व लोकांना पाहताच त्यांनी तिथून पळ काढला. या घटनेची तक्रार देवरी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे.