पुणे : पुण्यातल्या मॉलमध्ये यापुढेही पार्किंग विनाशुल्कच मिळण्याची शक्यता आहे. कारण पुणे मॉल मध्ये पार्किंगसाठी पैसे आकारु नये, असा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर केला होता. या विरोधात मॉलमालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, पण महापालिकेच्या निर्णयाला स्थगिती द्यायला उच्च न्यायालयानं नकार दिला. पार्किंगसाठी पैसे घेऊन कोणता कायदा मोडला? हे नोटीसमध्ये स्पष्ट करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पुण्यासंदर्भात उच्च न्यायालयानं स्थगिती द्यायला नकार दिल्यानं, राज्यभरात मॉलमध्ये विनाशुल्क पार्किंग मिळणार का, याची उत्सुकता आहे. राज्यातल्या बहुतेक मॉलमध्ये पार्किंगसाठी पैसे घेतले जातात, पण या मॉलकडे पार्किंगसाठीचा परवानाही नसतो.