'राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पसंतीनुसार वाहन खरेदी करता येणार'

 राज्यपालांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांसाठी महत्वाची बातमी 

Updated: Jul 28, 2020, 08:39 PM IST
'राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पसंतीनुसार वाहन खरेदी करता येणार' title=

मुंबई : राज्यपालांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री हे सर्वजण आपल्या पसंतीनुसार वाहन खरेदी करु शकणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय आणला आहे. शासनाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या दर्जानुसार शासकीय वाहन खरेदीबाबत संभ्रम निर्माण होत होतं. या पार्श्वभुमीवर हा निर्णय जाहीर करण्यात आलायं. 

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उच्च न्यायालय मुख्य न्यायमुर्तींना वाहन त्यांच्या पसंतीनुसार खरेदी करता येणार आहे. यासाठी किंमत मर्यादा नसेल.

 राज्यातील जिल्ह्यांमध्ये दौऱ्यावर येणारे मंत्रिमंडळ सदस्य, कॅबिनेट मंत्री, उच्च न्यायालय न्यायाधिश, उप लोक आयुक्त, राज्यमंत्री यांना वाहन खरेदीसाठी २० लाखांची मर्यादा असेल. 
 
 मुख्यसचिव, महाधिवक्ता, राज्य निवडणूक आयुक्तांना वाहन खरेदीची मर्यादा १५ लाखांपर्यंत असेल. 
 
 राज्यपालांचा परिवार तसेच राज्य स्तरिय वाहन आढावा समितीती मान्यता दिलेल्या अधिकाऱ्यांसाठी वाहन खरेदी मर्यादा ही ८ लाखांच्या आत असणार आहे. 
 
वाहनाच्या बदल्यात नवे वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव वाहन आढावा समितीच्या मान्यतेने मंजुर होणार आहे.