नाशिक : भाजपने गुजरात निवडणुकीत लाभ मिळावा म्हणून जीएसटी स्लॅबमध्ये बदल केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ते नाशिकमध्ये बोलत होते.
कर्जमाफीसाठी २५ नोव्हेंबरनंतर रस्त्यावर उतरणार असल्याचेही पवारांनी यावेळी सांगितलंय. प्रत्येक आंदोलनकर्ता शेतकरी हा मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीचा वाटतो, असंही पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हाणला.
तसेच गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जीएसटीमध्ये बदल करण्यात आल्याचा हल्लाबोल पवारांनी केलाय. गुजरात निवडणुकीत काँग्रेससह आघाडी करणार असल्याचेही पवारांनी म्हटलंय. त्यामुळे भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याचे स्पष्ट झालेय.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, असे स्पष्टीकरण यावेळी शरद पवार यांनी दिलं.