close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

माणुसकी मेली, वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याला वाचवण्याऐवजी लोक व्हिडिओत दंग

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात कालपासून अनेक गावात चांगला पाऊस झाला आहे. 

Updated: Sep 19, 2019, 03:13 PM IST
माणुसकी मेली, वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याला वाचवण्याऐवजी लोक व्हिडिओत दंग

औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात कालपासून अनेक गावात चांगला पाऊस झाला आहे. याचवेळी सिल्लोड तालुक्यात बुधवारी झालेल्या पावसात माणुसकीही वाहून गेल्याचा अनुभव आला. सावखेडा गावाजवळ पूर्णा नदीला पूर आला होता. त्यात शेतकरी पंडित गोंगे हे वाहून जात होते. मात्र, काही हौशी लोक त्याचा व्हिडिओ करत होते. त्यांच्या मदतीला कोणीही गेले नाही. हे शेतकरी गावात आईसाठी औषध आणायला निघाले होते. पायी जात असताना नदीला पाणी होते, मात्र पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यात ते वाहून गेलेत. या शेतकऱ्यांचा जातानाचा व्हिडिओ लोकांनी मोबाईलमध्ये चित्रित केला. 

सिल्लोड तालुक्यात काल पासून अनेक गावात चांगला पाऊस झाला आहे. खासकरून शिवना परिसराला बुधवारी मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र असलेल्या आमसरी इथला देवस्थानातील धबधबा वाहायला लागला आहे. परिसरातील मादणी गावाजवळ अजिंठा बुलढाणा राज्य रस्त्याचे काम सुरू असून, या रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. तर, शेकडो हेक्टर शेती पावसामुळे वाहून गेली आहे. तालुक्यात पहिलाच जोरदार पाऊस आहे.