रत्नागिरीत मुसळधार पावसाने दाणादाण, चिपळूण-खेड-राजापूर बाजारपेठेत पुराचे पाणी

रत्नागिरी जिल्ह्यात वादळासह  जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून दैना उडवून दिली आहे.  

Updated: Aug 4, 2020, 03:42 PM IST
रत्नागिरीत मुसळधार पावसाने दाणादाण, चिपळूण-खेड-राजापूर बाजारपेठेत पुराचे पाणी  title=

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात वादळासह  जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून दैना उडवून दिली आहे. राजापुरातही पुराचे पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे. बाजारपेठ पाणीखाली आली आहे. तर खेडमध्येही पुराचे पाणी शिकले आहे. तर चिपळूणमध्ये रात्रीपासून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि भरतीची वेळ यामुळे चिपळूण शहर शहरात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदी या नद्यांची धोक्याती पातळी ओलांडली असून शहरात पाणी भरु लागले आहे. चिपणळूण नगरपरिषदेने दुपारी तीनवेळा भोंगा वाजवून नागरिकांना अलर्ट केले आहे.

चिपळुणात पुराचे पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ झाली आहे.  सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन नगर परिषदेने दुपारी १२ वाजता भोंगा वाजवून केले होते. त्यामुळे व्यापारी अधिक सतर्क झालेत. चिपळूण  शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असल्याने शहरामध्ये पाणी भरण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे ज्यामुळे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. शहरातील नागरिकांनी कोणत्याही मदतीकरिता नगरपरिषदेच्या चोवीस तास सुरू असलेल्या नियंत्रण कक्षामध्ये फोन करावा, असे आवाहन चिपळूण नगरपरिषदेने केले होते.

 रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरुच आहे. चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. तर राजापूर बाजार पेठेत कोदवली नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने सगळीकडे पाणीचपाणी दिसत होते. तर चिपळूण शहर, खेड बाजारपेठ, माखजन बाजारपेठ पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे असाच पाऊस कोळत राहिला तर बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते, म्हणून जिल्हा प्रशासनाने सावधनतेचा इशारा दिला आहे.

रायगड जिल्ह्यातही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली, महाड शहरात पुराचे पाणी घुसले आहे. रायगड जिल्ह्यातील  जिल्ह्यातील अंबा, उल्हास, आणि  गाढी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलंडण्यास सुरुवात केली आहे. महाड रात्रभर पडलेल्या पावसामुळे सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली असून महान शहरांमध्ये पाणी घुसले आहे बाजारपेठेत पाणी असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.