नागपूर : मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस सुरू असतानाच, विदर्भालाही मुसळधार पावसानं झाडपून काढलंय. सोमवारी मध्यरात्री यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आलीय. चार तासात 135 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलाय.
सकाळपासून पावसाने विश्रांती घेतलीय. त्यामुळे नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळालाय. पण रात्रीच्या पावसानं अनेक सखल भागात पाणी शिरलंय. गडचिरोली शहर आणि जिल्ह्यात सकाळपासून बरसलेल्या संततधारेने नागरिकांची चांगलीच त्रेधा उडविली.
गेल्या काही दिवसात असा पाऊस बरसला नव्हता. २४ तासात सरासरी सुमारे ५३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातल्या पंधरा सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद झालीय. पावसाने गडचिरोली नगरपालिकने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी केलेले नियोजन फसलेले दिसून आले.
गडचिरोली शहर आणि जिल्ह्यात सकाळपासून बरसलेल्या संततधारेने नागरिकांची चांगलीच त्रेधा उडविली. २४ तासांत सरासरी सुमारे ५३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, जिल्ह्यातल्या ४० महसुली मंडळांपैकी १५ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक पाऊस आरमोरी, कोरची आणि भामरागड भागात झालाय. पहाटे ५ वाजल्यापासून गडचिरोलीत संततधार सुरु झाली.
कन्नमवार नगरात पाणी मोठ्या प्रमाणात साचलं होतं. तर शहराच्या विविध भागांतही अशाच प्रकारे चित्र पाहायला मिळालं. शहरात सांडपाणी आणि पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य नियोजन न केल्यानं ही परिस्थती ओढवल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.