महाराष्ट्रातल्या या शहरात दररोज होतेय एक आत्महत्या

अपयशाने खचून गेल्याने आपलं आयुष्यच संपवणाऱ्यांची उदाहरणं सातत्याने पुढे येत असतात. तरुणांचीच यात संख्या जास्त आहे. नाशिक शहरात दिवसाला एक आत्महत्या होत असल्याचं समोर आलंय. महिनाभरात जवळपास ३४ हून अधिक आत्महत्या झाल्याची नोंद आहे. वैफल्य, निराशा यातून या आत्महत्या घडत आहेत. गेल्या महिन्याभरात ३४ जणांनी तर गेल्या चार महिन्यात १०४ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. धक्कादायक म्हणजे यातली १० टक्के संख्या ही अल्पवयीन मुलांची आहेत. तर ८० टक्के संख्या २० ते ५० वयोगटातली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय मगर यांनी दिलीय.

Updated: May 3, 2018, 10:59 PM IST
महाराष्ट्रातल्या या शहरात दररोज होतेय एक आत्महत्या  title=

किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : अपयशाने खचून गेल्याने आपलं आयुष्यच संपवणाऱ्यांची उदाहरणं सातत्याने पुढे येत असतात. तरुणांचीच यात संख्या जास्त आहे. नाशिक शहरात दिवसाला एक आत्महत्या होत असल्याचं समोर आलंय. महिनाभरात जवळपास ३४ हून अधिक आत्महत्या झाल्याची नोंद आहे. वैफल्य, निराशा यातून या आत्महत्या घडत आहेत. गेल्या महिन्याभरात ३४ जणांनी तर गेल्या चार महिन्यात १०४ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. धक्कादायक म्हणजे यातली १० टक्के संख्या ही अल्पवयीन मुलांची आहेत. तर ८० टक्के संख्या २० ते ५० वयोगटातली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय मगर यांनी दिलीय.

सततचा तणाव, अपेक्षांचं ओझं यामुळे आत्महत्या होतायत. त्याचसोबत सोशल मीडियाचा वाढता वापर हेही एक कारण असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. 

हा प्रकार धक्कादायक आहे. पालकांनी यातून धडा घेण्याची गरज आहे... आपल्या मुलांशी संवाद वाढवणं गरजेचं आहे... मुळात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे केवळ सुविचारात न उरता त्याचा अर्थ पालकांनी मुलांना सांगण्याची गरज आहे... हुकलेली संधी पुन्हा नक्की मिळते... पण गेलेला जीव परत येत नाही.