सरसंघचालक म्हणाले- बांगलादेशात हिंदू तणावात; त्यांची सुरक्षा सरकारची जबाबदारी!

Mohan Bhagwat on Bangladesh Hindu: बांगलादेशातील हिंदूंवर होत असल्याने भागवतांनी खंत व्यक्त केली.

Pravin Dabholkar | Updated: Aug 15, 2024, 11:32 AM IST
सरसंघचालक म्हणाले- बांगलादेशात हिंदू तणावात; त्यांची सुरक्षा सरकारची जबाबदारी! title=
बांगलादेशात हिंदूंबद्दल सरसंघचालकांकडून चिंता व्यक्त

Mohan Bhagwat on Bangladesh Hindu: सरसंघचालक मोहन भागवत स्वातंत्र्यदिनी नागपूरच्या संघमुख्यालयात ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर सरसंघचालक मोहन भागवतांनी चिंता व्यक्त केली. शेजारच्या देशात उत्पात होतोय. हिंदूना त्रास दिला जातोय.आपण कधीच दुसऱ्यावर हल्ला केला नाही, दुसऱ्याला अडचणीत मदतच केली..मात्र, बांगलादेशातील हिंदूंवर होत असल्याने भागवतांनी खंत व्यक्त केली.

बलिदान करणाऱ्यांच्या मागे खंबीर राहणारा समाज 

आज देशाला अभीष्टचिंतन करण्याचा दिवस आहे. केवळ चिंतन करून होत नाही.याच्याकरता मोठा संघर्ष करावा लागला.1857 नंतर 90 वर्षाचा संघर्ष चालला. अनेक प्रकारच्या लोकांनी त्यात सहभागी झाले. आपल्या देशात प्रत्येक कोपऱ्यात स्वातंत्र्य नायक झाले.सामान्य व्यक्ती पण  स्वातंत्र्याकरता रस्त्यावर उतरला. अनेकजण जेलमध्ये गेले अनेक अनेकांना अनेकदा कारावास झाला. शक्तिनुरूप प्रत्येकाने सहभाग घेतला.बलिदान करणारा समूह आणि त्याच्यामागे खंबीरपणे उभा राहणारा समाज त्यानंतर आपल्याला स्वतंत्रता मिळाल्याचे मोहन भागवत म्हणाले.  

वैद्यकीय क्षेत्रात 75 हजार जागा निर्माण करणार, लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांची मोठी घोषणा

'भारत जगाच्या उपकाराकरता उभा राहतो'

आता येणाऱ्या पिढीला स्वतंत्रता रक्षा करायची आहे.विश्वात अनेक लोक आहेत की ज्यांना अन्य देशांवर वर्चस्व गाजवायचे आहे..त्याकरता सजग रहायचे आहे.शेजारील देशमध्ये उत्पात होतोय.हिंदूंना त्रास होतोय भारत वर्ष असा आहे की स्व ची रक्षा आणि स्वतंत्र्याचा दायित्व आहेच मात्र भारताची परंपरा राहिली की आहे जगाच्या उपकाराकरता उभा राहतो. आपण कधीच कोणावर आक्रमण केले नाही. जो संकटामध्ये असेल त्याला मदतच केली आहे. तो आपल्या सोबत कसा व्यवहार करतो हे बघितले नाही.जो संकटात आहे त्याला मदत करायची.जगभरातील दुःखपिडिताकरता आपण हे करतो  सरकार हे करत असते. आपला देश ठीक राहीलआणि अन्य देशांना आपली मदत होईल, असेही ते म्हणाले. 

स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना खूप दूर होते महात्मा गांधी? काय होतं कारण? 

समाजाने सुद्धा सजगता ठेवावी

या देशांमध्ये जी अस्थिरता आणि अराजकता झेलणारे जे लोक आहे. त्यांना काही कष्ट होऊ नये त्यांच्यावर काही अत्याचार होऊ नये याची जबाबदारी एक देशाच्या नाते आपल्यावर आहेच. काही गोष्टी सरकारने आपल्या स्तरावरच कराव्या  त्याकरता सामान्य समाजाने सुद्धा सजगता ठेवावी, तशी मनोवृत्ती ठेवावी, असे ते म्हणाले.