कोरोनाचे सावट : कोकणात येऊच नका, अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द

कोकण रेल्वे मार्गावर उद्या रविवारी जनता कर्फ्यूमुळे अनेक पॅसेंजर रद्द करण्यात आल्या होत्या. आता एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.  

Updated: Mar 21, 2020, 08:58 PM IST
कोरोनाचे सावट : कोकणात येऊच नका, अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द    title=

मुंबई : कोरोनामुळे राज्यशासनाने प्रवास करु नये, असे आवाहन करुनही अनेक जण मुंबईतून गावी जाण्यास प्राधान्य देत आहेत. कोकणात जाणाऱ्यांचे प्रमाण अचानक वाढले आहे. राज्य शासनाने ३१ मार्च २०२० पर्यंत प्रमुख महानगरे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून घरीच राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. असे असताना काही जण स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घातल आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा अंशत: बंद करण्याचा घेतला आहे. कोकण रेल्वे मार्गावर उद्या रविवारी जनता कर्फ्यूमुळे अनेक पॅसेंजर रद्द करण्यात आल्या होत्या. आता एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कोकणात जाऊ नका आणि येऊ नका, असे आवाहन करण्यात येत आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील पॅरेंजर रद्द

दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. ही संख्या ६४वर पोहोचली आहे. आज गुजरातमधून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एक कर्मचारी विमानतळावरील कर्मचारी आहे. आणि एक पुण्यातील महिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरीच राहावे, असे आवाहन राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सगळ्यांनी घरीच राहून सर्वांना पोहोचणारा धोका टाळा, असे आवाहनही करण्यात आले आहे. उद्या जनता कर्फ्यु आहे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नये, योग्य ती घबरदारी घेण्याचेही सूचविण्यात आले आहे.

राज्यात कोरोनाव्हायरसचे संकट आहे. उद्या रविवारी जनता कर्फ्यू आहे.त्यामुळे उद्या कोंकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात मांडवी एक्स्प्रेस,  जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस, डबल डेकर, तुतारी एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

10103/10104 मडगाव मुंबई मडगाव मांडवी एक्स्प्रेस 
12051/12052 दादर मडगाव दादर जनशताब्दी एक्स्प्रेस. 
 22119/22120 मुंबई कर्मली मुंबई तेजस एक्स्प्रेस. 
12619/12620 कुर्ला मंगळूर कुर्ला मत्स्यगंधा एक्स्प्रेस.  
16345 कुर्ला तिरुव नेत्रावती एक्स्प्रेस 
10112 मडगाव मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस.
11004 सावंतवाडी दादर तुतारी एक्स्प्रेस. 
12134 मंगळूर मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस.
11100 मडगाव कुर्ला डबल डेकर