Breaking News Live Updates: मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट, कोकणाला रेड अलर्ट

Breaking News Live Updates:  राज्यातील व देशभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा, जाणून घेऊया.

Breaking News Live Updates: मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट, कोकणाला रेड अलर्ट

Mumbai Rain Live Updates: मुंबईत दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. तर, राज्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही जिल्ह्यात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. तर, एकीकडे आज पावसाळी अधिवेशनदेखील सुरू आहे. राज्यातील व देशभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा, जाणून घेऊया.

8 Jul 2024, 22:48 वाजता

Breaking News Live Updates: 'या' ठिकाणच्या शाळांना सुट्टी

संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमशान घातले आहे. कोकणात पावसाने कहर केला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. खरबरदारी म्हणून प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. 

8 Jul 2024, 21:30 वाजता

Breaking News Live Updates: मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट, कोकणाला रेड अलर्ट

सकाळी 8.30 ते रात्री 8.30 दरम्यान मुंबईत 100-120mm पावसाची नोंद झाली आहे. यावेळी मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर कोकणाला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

8 Jul 2024, 20:06 वाजता

Breaking News Live Updates: धोकादायक गावातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा- आदिती तटकरे

धोकादायक गावातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा अशा मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. आदिती तटकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून घेतला जिल्ह्यातील सद्य स्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात 103 गावं धोकादायक क्षेत्रात तर 9 गावे अतिधोकादायक क्षेत्रात, 11 गावे मध्यम धोकादायक आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेवून यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्यात

8 Jul 2024, 17:59 वाजता

Breaking News Live Updates: सीएनजी, पाईप गॅसचे दर वाढवले; आज मध्यरात्रीपासून होणार दरवाढ लागू

महानगर गॅसने सीएनजीचे आणि पाईप गॅसचे दर वाढवले. सीएनजीमध्ये प्रति किलो 1.50 रुपयाने दरवाढ झाली आहे. तर पाईप गॅसच्या किंमतीत 1 रुपयाने वाढ झाली आहे. आज मध्यरात्रीपासून होणार दरवाढ लागू होणार आहे. आता सीएनजीची किंमत 75 रुपये प्रति किलो

8 Jul 2024, 17:28 वाजता

Breaking News Live Updates: 'ड्रंक अँड ड्राईव्ह' रोखण्यासाठी कडक कारवाया करा- मुख्यमंत्री

मुंबईतील ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिली असून यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कडक कारवाया करण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाया करण्यात याव्यात, अशी सूचनाही मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनास देण्यात आली आहे.

8 Jul 2024, 16:46 वाजता

Breaking News Live Updates: ठाण्यात पुढील तीन दिवस अनियमित पाणीपुरवठा

भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. दोन्ही पंपिंग स्टेशनमध्ये पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पाणीपुरवठा कमी होत असल्याने महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यात समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे, ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील तीन दिवस (०९, १० आणि ११ जुलै, २०२४) अपुऱ्या प्रमाणात अनियमित पाणीपुरवठा होईल अशी माहिती ठाणे महालिकेने दिलीय.

8 Jul 2024, 15:29 वाजता

Breaking News Live Updates: मराठा व ओबीसी आरक्षणासंदर्भात होणारी सर्वपक्षीय बैठक रद्द 

आज सायंकाळी होणारी मराठा व ओबीसी आरक्षणासंदर्भात होणारी सर्वपक्षीय बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक उद्या सायंकाळी ६.३० वाजता होणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली आहे. मुसळधार पावसामुळे बैठक रद्द झाली आहे

8 Jul 2024, 14:26 वाजता

Breaking News Live Updates: 267 मिमिपेक्षा जास्त पाऊस पडल्याने मुंबईत पूरस्थितीः मुख्यमंत्री शिंदे

8 Jul 2024, 14:23 वाजता

Breaking News Live Updates: गरजेशिवाय घराबाहेर पडू नकाः मुख्यमंत्र्यांचे मुंबईकरांना अवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालिकेच्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले आहेत. त्यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेतला आहे.

8 Jul 2024, 14:12 वाजता

Breaking News Live Updates: मुंबईतील अतिवृष्टीचे पडसाद विधीमंडळ कामकाजावर

विधानसभा आज दिवसभरासाठी स्थगित. उद्या सभागृह सकाळी 11 वाजता सुरू होईल