Mumbai Rain Live Updates: मुंबईत दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. तर, राज्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही जिल्ह्यात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. तर, एकीकडे आज पावसाळी अधिवेशनदेखील सुरू आहे. राज्यातील व देशभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा, जाणून घेऊया.
8 Jul 2024, 08:31 वाजता
Breaking News Live Updates: मुंबईतील या ठिकाणी कोसळला सर्वाधिक पाऊस
मुंबई शहर आणि उपनगरांत दिनांक ८ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री १ वाजेपासून सकाळी ७ वाजेदरम्यान सर्वाधिक पाऊस कोसळलेली ठिकाणे आणि पावसाचे प्रमाण.
- वीर सावरकर मार्ग महानगरपालिका शाळा (३१५.६ मिमी)
- एमसीएमसीआर पवई (३१४.६ मिमी)
- मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (२९२.२ मिमी)
- चकाला महानगरपालिका शाळा (२७८.२ मिमी)
- आरे वसाहत महानगरपालिका शाळा (२५९.० मिमी)
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा (२५५.० मिमी)
- नारीयलवाडी शाळा (२४१.६ मिमी)
- जिल्हाधिकारी वसाहत (कलेक्टर कॉलनी) महानगरपालिका शाळा (२२१.२ मिमी)
- प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा (२२०.२ मिमी)
- नूतन विद्यामंदिर (१९०.६ मिमी)
- लालबहादूर शास्त्री मार्ग महानगरपालिका शाळा (१८९.० मिमी)
- शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा (१८५.८ मिमी)
- रावळी कॅम्प (१७६.३ मिमी)
- धारावी काळा किल्ला महानगरपालिका शाळा (१६५.८ मिमी)
- बी. नाडकर्णी उद्यान महानगरपालिका शाळा (१५६.६ मिमी
8 Jul 2024, 08:29 वाजता
Breaking News Live Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज
हवामान खात्याने मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, ही विनंती.
8 Jul 2024, 08:29 वाजता
Breaking News Live Updates: मध्य मार्गावर लोकल ट्रेन सेवा पुन्हा सुरू
पावसाचे पाणी ओसरल्यानंतर मध्य मार्गावर लोकल ट्रेन सेवा पुन्हा सुरू झाली आहे. कुर्लायेथून लोकल रवाना झाली आहे.
8 Jul 2024, 08:24 वाजता
Breaking News Live Updates: कोल्हापूरहून मुंबईला जाणारी एक्स्प्रेस अंबरनाथमध्ये रखडली
कोल्हापूरहून मुंबईला जाणारी एक्स्प्रेस अंबरनाथमध्ये रखडली आहे. मुंबईत रेल्वेसेवा बंद असल्यानं अंबरनाथच्या सायडिंगला एक्स्प्रेस उभी असून सकाळपासून एक्स्प्रेस उभी असल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
8 Jul 2024, 08:09 वाजता
Breaking News Live Updates: रायगड - अलिबाग व मुरुड तालुक्यातील शाळा , महाविद्यालयाना सुट्टी
रायगड - अलिबाग व मुरुड तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयाना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. अलिबाग मुरुड तालुक्यात काही भागात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. पावसाची शक्यता लक्षात घेवून प्रशासन अलर्ट मोडवडवर असून रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
8 Jul 2024, 07:39 वाजता
Breaking News Live Updates: मध्य रेल्वेवरील सायन आणि भांडुप स्थानकातील लोकल वाहतूक पूर्ववत
मध्य रेल्वेवरील सायन आणि भांडुप रेल्वे स्थानकातून लोकल वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. जलद मार्गावरुन काही प्रमाणात लोकल सोडण्यात येत आहेत. रेल्वे रूळांवरुन पाणी ओसरायला सुरुवात झाल्यानंतर लोकल सुरू करण्यात येत आहेत.
#WATCH | Mumbai | Train services have resumed on Central Line at Sion and Bhandup stations after rainwater has receded
Crowds gathered at Bhandup station amid heavy rainfall pic.twitter.com/kuDeBUhpkB
— ANI (@ANI) July 8, 2024
8 Jul 2024, 07:03 वाजता
Breaking News Live Updates: मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले, वाहतूक कोंडी
मुंबईत सायन, माटुंगा, दादर सखल भागात पाणी साचल्याने त्याचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वेस्टर्न एक्सप्रेस वेवर अंधेरी-पार्ले या भागात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे.
8 Jul 2024, 07:03 वाजता
Breaking News Live Updates: हार्बर मार्गावर पाणी साचले, लोकल कोलमडली
हार्बर मार्गावर रुळांवर पाणी साचल्यामुळं लोकल विस्कळीत झाली आहे. लोकल उशिराने धावत आहेत.
ALERT--Due to Heavy Rain In Mumbai Suburban & Harbour Line Train Traffic Delay Due To Watter Logging.
Effected Station- CSMT- CHF-LTT.— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) July 7, 2024
8 Jul 2024, 06:55 वाजता
Breaking News Live Updates: अलीबागच्या नेहूली खंडाळा भागात ढगफुटी सदृश्य पाऊस
अलिबाग तालुक्यातील नेहुली खंडाळा परिसरात पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. गावातील 6 ते 7 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. या घरात साधारण दीड फुटापर्यंत पाणी होते.
- ‹ previous
- 1
- 2
- 3
- 4