Mumbai Rain Live Updates: मुंबईत दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. तर, राज्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही जिल्ह्यात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. तर, एकीकडे आज पावसाळी अधिवेशनदेखील सुरू आहे. राज्यातील व देशभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा, जाणून घेऊया.
8 Jul 2024, 14:11 वाजता
Breaking News Live Updates: आज समुद्राला 1.57 मिनिटांनी भरती
आज दुपारी एक वाजून 57 मिनिटांनी भरती आहे. याच दरम्यान 4.40 उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती महापालिकेकडून मिळत आहे. दरम्यान याच काळात मुसळधार पाऊस जर कोसळत राहिला तर मुंबईत पुन्हा एकदा पाणी भरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे
8 Jul 2024, 14:11 वाजता
Breaking News Live Updates: हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्ववत
वडाळा आणि मानखुर्द दरम्यान डाऊन आणि अप हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
8 Jul 2024, 13:39 वाजता
Breaking News Live Updates: पुढील 24 तासात राज्यात मुसळधार वा अतिवृष्टी होण्याची शक्यता
पुढील 24 तासात पश्चिम विदर्भातील अकोला,अमरावती, यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट. नागपूर प्रादेशिक वाहन विभागाने जारी केला अलर्ट मुसळधार वा अतिवृष्टी होण्याची शक्यता. बुलढाणा आणि नागपूरच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.
8 Jul 2024, 13:38 वाजता
Breaking News Live Updates: पुढील 24 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता
पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी.
8 Jul 2024, 13:02 वाजता
Breaking News Live Updates: हतनुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली
हतनूर धरणाचे ४१ पैकी १० दरवाजे १.०० मी. उंचीने उघडलेले, तापी नदीपात्रात सद्यस्थितीत १९ हजार १०५ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू. संततधार पाऊस सुरू असल्याने पुढील काही तासांत २५,००० ते ३०,००० कयुसेस पर्यंत विसर्ग तापी नदी पात्रात होण्याची शक्यता
8 Jul 2024, 12:34 वाजता
Breaking News Live Updates: मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास, पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत; अजित पवारांचे ट्विट
काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे. हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या १० टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. वर्षातील 365 दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे.
हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या १० टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 8, 2024
8 Jul 2024, 12:01 वाजता
Breaking News Live Updates: रविवारी मध्यरात्रीपासून ते सोमवार सकाळपर्यंत मुंबईत २६७.९ मिलिमीटर इतका पाऊस
8 Jul 2024, 11:19 वाजता
Breaking News Live Updates: पवई तलाव ओव्हर फ्लो
पवई तलाव ओव्हर फ्लो काल रात्री पडलेल्या पावसाने ६ तासात तलावातील पाणीसाठा वाढून ओव्हर फ्लो
8 Jul 2024, 11:16 वाजता
Breaking News Live Updates: मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसाचा नाशिकच्या रेल्वे प्रवाश्यांना फटका
नाशिकहून मुंबई जाणाऱ्या रेल्वे अर्धा तास उशिरा आहेत. तर मुंबईहून येणाऱ्या रेल्वे उशिरा असल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी आहे. मुंबईहून भुसावळसह अन्य ठिकाणी जाणारी रेल्वे वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळित झाल्याने प्रवाश्यांना मनस्ताप
8 Jul 2024, 11:16 वाजता
Breaking News Live Updates: CSMT-ठाणे दरम्यान लोकल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
सीएसएमटी - ठाणे दरम्यान डाऊन आणि अप फास्ट मार्गावरील मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा मर्यादित वेगाने पूर्ववत करण्यात आली. मेल एक्सप्रेस गाड्याही हलवल्या जात आहेत.