Mumbai Rain Live Updates: मुंबईत दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. तर, राज्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही जिल्ह्यात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. तर, एकीकडे आज पावसाळी अधिवेशनदेखील सुरू आहे. राज्यातील व देशभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा, जाणून घेऊया.
8 Jul 2024, 10:40 वाजता
Breaking News Live Updates: तब्बल तीन तासांच्या खोळंब्यानंतर अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना
8 Jul 2024, 10:36 वाजता
Breaking News Live Updates: मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परिक्षा पुढे ढकलल्या
मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाइन एज्युकेशन (आयडॉल ) ज्या परीक्षा सकाळच्या सत्रात होत्या त्या परीक्षा मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आले आहेत आजच्या सर्व परीक्षा 13 जुलै रोजी होणार असल्याचा मुंबई विद्यापीठाने नोटीस जारी करत सांगितले आहेत
8 Jul 2024, 09:53 वाजता
Breaking News Live Updates: मुंबई- नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी ब्रिजवर वाहतूक कोंडी
मानखुर्द मध्ये झालेल्या वाहतूक कोंडीचा परिणाम मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी ब्रिजवर दिसून येतोय. वाशी ब्रिजवर वाशी कडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
8 Jul 2024, 09:53 वाजता
Breaking News Live Updates: लोकल पुन्हा कोलमडली; CSMT- ठाणे जलद मार्गावरील वाहतूक ठप्प
ठिकठिकाणी पाणी साचल्याने सीएसएमटी-ठाणे दरम्यान डाऊन आणि अप जलद मार्गावरील मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा बंद आहे. मात्र, डाऊन आणि अप धीम्या मार्गावर धावत आहेत. चुनाभाटी येथे पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
Maharashtra | Due to water logging at various places, train services on Main line-Down & Up Fast line between CSMT-Thane is suspended. However, Down & Up slow lines are running. Harbour line services are temporarily suspended due to waterlogging at Chunnabhati: Central Railway pic.twitter.com/pheO8vBsiW
— ANI (@ANI) July 8, 2024
8 Jul 2024, 09:23 वाजता
Breaking News Live Updates:वडाळा आणि जीटीबी स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी
वडाळा आणि जीटीबी स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. आज पहाटे 1 ते सकाळी 7 वाजेपर्यंत मुंबईत 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दिवसभरात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे
8 Jul 2024, 09:21 वाजता
Breaking News Live Updates: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ट्रेन 20 ते 25 मिनिटे उशिराने
मुसळधार पावसामुळे माटुंगा रोड ते दादर दरम्यान रुळावरून पाणी साचल्याने उपनगरीय गाड्या 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे रुळांवरून पाणी काढून टाकण्यासाठी उच्च क्षमतेचे जलपंप वापरले जात आहेत: पश्चिम रेल्वे
8 Jul 2024, 08:39 वाजता
Breaking News Live Updates: कोल्हापूर जिल्हयात पावसाचा जोर, पंचगंगा नदी पात्राबाहेर, 50 हून अधिक बंधाऱ्यांवर पाणी
कोल्हापूर जिल्ह्यात देखील 24 तासात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहात असून पंचगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फूट 2 इंच इतकी असून एका रात्रीत दीड फुट पाणी वाढले आहे. जिल्ह्यातील 50 बंधारी पाण्याखाली गेले असून 14 धरण क्षेत्रात अतिवृष्टी सदृष्ये पाऊस झाला आहे.
8 Jul 2024, 08:36 वाजता
Breaking News Live Updates: रात्रभर झालेल्या दमदार पावसामुळे नालासोपाऱ्यात रस्ते जलमय
वसई विरार परिसरात काल रात्री मुसळधार पावसाच्या सरी बरसल्याने शहरातील सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. नालासोपारा पूर्वेच्या आचोळे रोडवर दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन फूट पाणी साचले आहे, या साचलेल्या पाण्यामुळे शहरातील वाहतूक मंदावलेली पाहायला मिळत आहे
8 Jul 2024, 08:35 वाजता
Breaking News Live Updates: रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला
मध्यरात्रीपासून पाऊस थांबल्यामुळे जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या अद्यापही इशारा पातळीवर असून काजळी अर्जुना कोदावली, शास्त्री , मुचकुंदी इशारा पातळीवर आहेत. चांदेराई बाजारपेठेतील पाणी ओसरलं असलं तरी हवामान विभागाचा आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
8 Jul 2024, 08:32 वाजता