8 Dec 2023, 22:07 वाजता
'कुणबी दाखल्यांसाठी लंगोटी घालून फिरा', प्रकाश शेंडगेंचं वादग्रस्त वक्तव्य
Prakash Shendge : सरसकट कुणबी दाखले हवे असतील तर कोकणातील कुणबी समाजाप्रमाणे आधी 10 वर्षे लंगोट घाला...असं वादग्रस्त वक्तव्य प्रकाश शेंडगेंनी केलं...कुणबी दाखले म्हणजे मागच्या दाराने प्रवेश करण्याचा प्रकार असल्याचाही पुनरूच्चार शेंडगेंनी केलाय...त्याला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर देताना शेंडगेंना महत्त्व देण्याची गरज नाही असं म्हटलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
8 Dec 2023, 21:37 वाजता
आता परवानगी घ्यावी लागत नाही, टोलही नाहीसे झाले- अमोल कोल्हे
Amol Kolhe : याआधी मतदारसंघात यायचं असेल तर आमदारांना फोन करून परवानगी घ्यावी लागत होती, टोल द्यावा लागत होता. मात्र आता परवानगी घ्यावी लागत नाही, टोलही नाहीसे झाले असं मोठं विधान खासदार अमोल कोल्हे यांनी केलंय. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज खेड इथं महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. अनेक दिवसांपासून मतदार संघात येत नसल्याचा आरोप केला जात होता. त्यावर बोलताना अमोल कोल्हेंनी आमदारांचा उल्लेख केलाय. अर्थात अमोल कोल्हेंचा नेमका रोख कुणाकडे आहे? हे मात्र गुलदस्त्यातच आहे. :
8 Dec 2023, 20:36 वाजता
राष्ट्रवादी कुणाची?, निवडणूक आयोगानं निर्णय राखून ठेवला
NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या मुद्द्यावरुन गेल्या चार महिन्यांपासून केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती. अखेर निवडणूक आयोगातील सुनावणी आज संपलीय. दोन्ही गटांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता लवकरच या प्रकरणातला सर्वात मोठा निकाल समोर येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज सुनावणी पार पडली. दोन्ही गटांचा युक्तिवाद आज पूर्ण झाला आहे. निवडणूक आयोगानं आता दोन्ही गटांना लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. याबाबतचा निकाल कधी जाहीर करायचा, हे निवडणूक आयोग ठरवणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाकडून निकाल दिला जातो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, सुनावणीवेळी दोन्ही गटांच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
8 Dec 2023, 19:38 वाजता
जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटलांमध्ये चर्चा
Jayant Patil Dilip Walse Patil Meet at Pune Airport : जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील यांच्यात विमानतळावर चर्चा सुरूय. गेल्या अर्ध्या तासापासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. पुणे विमानतळाच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये गेल्या अर्ध्या तापासून ही चर्चा सुरू आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
8 Dec 2023, 19:05 वाजता
अंबादास दानवेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Ambadas Danve's Letter to Devendra Fadnavis : नवाब मलिक चालत नाहीत, मग प्रफुल्ल पटेल कसे काय चालतात...असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय...दानवेंनी फडणवीसांना पत्र लिहित हा सवाल केलाय...पटेल यांचे दाऊदच्या हस्तकाशी संबंध असल्याच्या कारणामुळे ईडीनं त्यांची मालमत्ता जप्त केलीये...त्यामुळं पटेल यांच्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन दानवेंनी केलंय...तर संजय राऊत आणि नाना पटोले यांनी हाच धागा पकडत सरकारवर निशाणा साधलाय.
8 Dec 2023, 18:34 वाजता
परभणीत तरुणाची निर्घृण हत्या
Parbhani Crime : परभणीच्या पूर्णा शहरातील श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालय परिसरात शुक्रवारी दुपारी एका तरुणाचा धारदार शस्त्रानं वार करून खून करण्यात आला. आकाश कदम असं मृत तरुणाचं नाव आहे... प्रेम प्रकरणातून त्याचा खून झाला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांनी दिलीय... घटनास्थळी बंदूक आणि गोळीही सापडल्यानं मयतावर आधी गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मात्र मयत तरुणाला गोळी लागली नसल्याचा दावा पोलीस अधीक्षकांनी केलाय
8 Dec 2023, 18:10 वाजता
मनमाडमध्ये कांदा लिलाव बंद
Onion auction Closed in Manmad : कांदा निर्यात बंदीचे तीव्र पडसाद नाशिकमध्ये दिसून आले आहेत.. मात्र चांदवडमध्ये सुरु असलेलं आंदोलन चिघळलंय..चांदवडमध्ये शेतक-यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला होता. तेव्हा आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आलाय. एक तासापेक्षा जास्त काळ हे आंदोलन सुरु होतं.. मात्र त्यामुळे वाहतुकीला फटका बसल्यानं अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. तिकडे उमराणा इथंही कांदा व्यापा-यांनी लिलाव बंद पाडत निषेध केला तर नांदगावमध्येही संतप्त शेतकऱयांनी येवला रोडवर आंदोलन केले. मनमाड,मुंगसे इथंही व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले.
8 Dec 2023, 17:34 वाजता
ओडिशाच्या काँग्रेस खासदाराच्या घरी नोटांचं घबाड
Dhiraj Sahu :काँग्रेस खासदाराच्या घरात चक्क करोडो रुपयांच्या नोटांचं घबाड सापडलंय... ओडिशाचे काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरातील कपाटात ही नोटांची बंडलंच्या बंडलं भरून ठेवली होती. इन्कम टॅक्सनं त्यांच्या घरी धाड घातली, तेव्हा ही तब्बल २५० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. साहूंच्या घरातील ९ कपाटांमध्ये 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटांची ही बंडलं रचून ठेवण्यात आली होती... ट्रकमधून 157 बॅगांमध्ये भरून ही रोकड इन्कम टॅक्स अधिका-यांना न्यावी लागली.. दरम्यान, या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X वरून जोरदार टीका केली... जनतेकडून जे लुटलं, त्याची पै न् पै परत करावी लागेल, ही मोदी गॅरंटी आहे, असं ट्विट मोदींनी केलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
8 Dec 2023, 17:07 वाजता
कांदा निर्यातबंदीबाबत सोमवारी तोडगा?
Onion Export Ban Decision on Monday : कांदा निर्यातबंदीबाबत सोमवारपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता. राज्य सरकारच्या पणन आणि कृषी विभागाची तातडीची बैठक झाली. कांदा व्यापाऱ्यांकडून लिलाव बंदची हाक दिलीये. निर्यातबंदीमुळं शेतकरी रस्त्यावर उतरलेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
8 Dec 2023, 16:31 वाजता
नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद
Onion Auction Closed in Nashik District : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे व्यापारी निर्यातबंदीविरोधात आक्रमक झाले आहेत. व्यापा-यांनी बेमुदत लिलावबंदची हाक दिलीय. तोडगा निघेपर्यंत लिलाव बंदच राहणार असल्याची भूमिका व्यापा-यांनी घेतलीय.