8 Dec 2023, 09:41 वाजता
मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक
Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय.. मराठा समाजाकडून आता थेट नागपूरच्या विधानभवन परिसरातच बॅनरबाजी करण्यात आलीय.. मराठा आरक्षणाला विरोध करणा-यांचा या बॅनरमधून समाचार घेण्यात आलाय. विशेष करुन 23 मार्च 1994 बद्दल बोला असा उल्लेख या बॅनरमध्ये करण्यात आलाय.. 23 मार्च 1994 रोजी तत्कालीन राज्य सरकारने अध्यादेश निघाला आणि ओबीसींचं आरक्षण 10 टक्क्यांवरुन 19 टक्क्यांवर गेलं असा दावा नेहमीच करण्यात येतो... त्याचाच उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
8 Dec 2023, 09:25 वाजता
ठाकरे गटाचं निवडणूक आयोगाला स्मरण पत्र
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला स्मरणपत्र पाठवलंय...धर्माच्या नावावर निवडणुकीत मते मागण्यास निवडणूक आयोगाची परवानगी आहे का...? अशा प्रचाराने आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असे आम्ही गृहित धरायचे का...? असा थेट सवाल उद्धव ठाकरे गटाने स्मरणपत्राद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाला केलाय...5 राज्यात भाजपने धर्माच्या नावाने प्रचार केल्याचा आरोप करत ठाकरेंनी पत्र लिहिलं होतं...त्यावर आयोगाने उत्तर न दिल्याने स्मरणपत्र लिहून धर्माच्या नावावर मतं मागितल्याने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही असे आम्ही मानायचे का...? अशी विचारणा केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
8 Dec 2023, 09:22 वाजता
'आनंदाचा शिधा' वर्षभर मिळणार?
Anandacha Shidha : आनंदाचा शिधा आता वर्षभर मिळण्याची शक्यता आहे. दिवाळी, दसरा आणि गुढीपाडव्यासारख्या सणांना गरीब आणि गरजूंना फक्त शंभर रुपयांत आनंदाचा शिधा वाटण्यात येतो.. नुकतंच मध्य प्रदेशात लाडली बहनासारखी योजना यशस्वी ठरली आणि पुन्हा भाजप सरकार सत्तेवर आलं.. तेव्हा राज्यातही आनंदाचा शिधा वर्षभर सुरु ठेवण्याचा प्रस्ताव आहे.. शिंदे-फडणवीस सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिवाळीपासून ही योजना सुरु केलीय.. राज्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय.. तेव्हा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांवर लक्ष्य ठेवत ही योजना मोफत करण्याचाही प्रस्ताव आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
8 Dec 2023, 09:20 वाजता
आदर्श पतसंस्था घोटाळ्याचा मुद्दा संसदेत
Imtiyaj Jalil : राज्यातील तब्बल 2 हजार कोटींच्या ठेवी धोक्यात आल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय...थेट संसदेमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श पतसंस्था घोटाळ्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला...यावेळी दाखला देताना त्यांनी राज्यातील विविध पतसंस्था आणि सहकारी बँकांची नावं वाचून दाखवली....आरबीआयचे नियंत्रण नसल्याने पतसंस्था मोकाट सुटल्याचा आरोप जलील यांनी केलाय...माजी सैनिकांसह गोरगरीब महिला, सेवानिवृत्त कर्मचा-यांचा पैसा या पतसंस्थांमध्ये अडकल्याचंही त्यांनी सांगितलं....
बातमीचा व्हिडीओ पाहा -
8 Dec 2023, 08:17 वाजता
हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी
Nagpur Winter Session : हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा दुसरा दिवसही गाजण्याची शक्यता आहे... अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान यावरुन विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काल शेताच्या बांधावर गेले.. मात्र मदत जाहीर न केल्याचा मुद्द्यावर विरोधक आंदोलन करण्याची शक्यता आहे. मात्र सर्वात मोठा राजकीय मुद्दा गाजणार आहे तो नवाब मलिकांचा.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल अजित पवारांना पत्र लिहून मलिकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय.. त्यावरुन आता अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.. मात्र विरोधकही यावरुन सत्ताधा-यांना घेरण्याच्या तयारीत आहेत.. तेव्हा आजही अधिवेशनात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा आखाडा पाहायला मिळेल...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
8 Dec 2023, 08:14 वाजता
RBI आज पतधोरण जाहीर करणार
RBI News : सर्वसामान्यांसाठी आणि शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे... कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज पतधोरण जाहीर करणार आहे... आरबीआयच्या पतधोरण आढाव्यात व्याजदर पुन्हा एकदा जैसे थे राहण्याचे स्पष्ट संकेत मिळतायत.. महागाई दर आरबीआयने निश्चित केलेल्या मर्यादेत आलाय. कच्च्या तेलाचे भाव, भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर या गोष्टी सध्या देशासाठी अनुकूल आहे.. त्यामुळे व्याजाचे दर कमी करण्यासाठी साजेशी स्थिती बनलीय.. आरबीआयच्या आजच्या घोषणेचा परिणाम शेअर बाजारावरही होण्याची शक्यता आहे.. सेन्सेक्स 70 हजार तर निफ्टी 21 हजारांची पातळी ओलांडेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
8 Dec 2023, 08:10 वाजता
अमरावतीत गोळीबाराचा थरार
Amravati Firing : अमरावतीमध्ये गुरूवारी रात्री गोळीबाराचा थरार पहायला मिळाला...अमरावतीहून अंगनगाव सुर्जीकडे जाणा-या कारचा पाठलाग करत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला... दर्यापूर येथील रफत पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडलीये...या घटनेमध्ये चार जण जखमी झाले असून तरूणी गंभीर आहे...गोळीबार करणारी कार सुस्साट निघून गेली...या घटनेमुळे दर्यापूर शहरात खळबळ उडाली आहे...मात्र, गोळीबार का करण्यात आला...? याचा कारण कळू शकलेलं नाहीये...
बातमीचा व्हिडीओ पाहा -