Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

8 Dec 2023, 16:12 वाजता

पिंपरी चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला आग, 6 जणांचा मृत्यू

 

Pimpri Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये फटाका कारखान्याला भीषण आग लागलीय. या आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू झालाय. 6 जण जखमी असून 2 जण अंतिगंभीर आहेत. तळवडे येथील स्पार्कलिंग कँडल नावाच्या कारखान्याला ही आग लागली. मृत्यूमुखी पडलेले सर्व कामगार असल्याचं सांगण्यात येतंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

8 Dec 2023, 15:18 वाजता

महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द

 

Mahua Moitra Parliament Membership Canceled : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. संसदेच्या एथिक्स पॅनलने कॅश फॉर क्वेरी प्रकरणात (संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याच्या आरोपात) दोषी ठरवले होते. तसेच खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यानुसारच, त्यांची ही खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी घेतला आहे.

8 Dec 2023, 14:43 वाजता

प्रफुल्ल पटेलांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

 

Praful Patel met Devendra Fadnavis : नवाब मलिक प्रकरणी फडणवीस भूमिकेवर ठाम आहेत...मी माझी भूमिका मांडलीय, तुम्ही पुढे काय करायचं ते ठरवा असं फडणवीसांनी प्रफुल्ल पटेलांना म्हटलंय...आज प्रफुल्ल पटेल हे मलिक प्रकरणी चर्चा करण्यासाठी फडणवीसांच्या भेटीला गेले होते...मलिकांनी भूमिका जाहीर केलेली नाही त्यामुळे मलिकांबाबत भूमिका घ्यायला नको होती असं मत पटेलांनी मांडलं...मात्र, फडणवीसांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मलिकांना विरोध केलाय...

8 Dec 2023, 13:32 वाजता

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार?

 

Devendra Fadanvis : अंतरवाली लाठीचार्ज प्रकरणावर फडणवीसांनी लेखी उत्तर दिलंय...आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत तपासणी करून आवश्यक कार्यवाही करू असं फडणवीसांनी म्हटलंय...अंतरवालीत दगडफेकीत 79 पोलीस तर लाठीचार्जमध्ये 50 आंदोलक जखमी झाले होते...याबाबत जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आलीय...अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधीक्षक अंबड एपीआय यांना निलंबित करून त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती देण्यात आली....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

8 Dec 2023, 13:08 वाजता

कांदा निर्यात बंदीचे पडसाद

 

Nashik Umrane Rastaroko : नाशिकच्या उमराणे गावात रास्तारोको करण्यात आलाय...कांदा निर्यात बंदीवरून शेतकरी आक्रमक झालेयत...31 मार्च 2024 पर्यंत कांद्यावर निर्यात बंदी घालण्यात आलीय...त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेयत...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

8 Dec 2023, 12:30 वाजता

एमपीएसीतील पदं वाढणार

 

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदं वाढविण्यात येणार आहेत...राज्य सरकाकडे पदं वाढविण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं आयोगानं सांगितलंय...कामकाजाचा व्याप वाढल्यानं पदांच्या आराखड्यात वाढ करण्याचा विचार असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे...2020 पासून 5151 पदांची शिफारस करण्यात आली असून 250 पेक्षा जास्त जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्याचं एमपीएसीनं सांगितलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा -

8 Dec 2023, 11:40 वाजता

संभाजीनगरमध्ये आयकर विभागाचे छापे

 

Sambhajinagar Income Tax Raid : संभाजीनगरमध्ये आयकर खात्याने टाकलेल्या छाप्यात तेराशे कोटींचे बेहिशेबी व्यवहार उघड झाले आहेत.. आयकर खात्याने 30 नोव्हेंबरपासून ते 4 डिसेंबपर्यंत हे छापे टाकले होते.. सलग पाच दिवसांच्या या छाप्यात सुमारे सहा कोटींची रोकड, चार कोटींचे दागिने तसंच मौल्यवान हिरे जप्त करण्यात आले आहेत.. आयकर चुकवण्यासाठी व्यावसायिक मोठ्या प्रमाणात रोखीचे व्यवहार करत होते..  खास करून बांधकाम व्यावसायिकांवर हे छापे टाकण्यात आले होते... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

8 Dec 2023, 11:29 वाजता

मलिकांनी भूमिका स्पष्ट केल्यावर बोलेन - अजित पवार

 

Ajit Pawar On Nawab Malik : फडणवीसांचं पत्र मला मिळालं असून, मलिकांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी बोलेन अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंंत्री अजित पवारांनी दिलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

8 Dec 2023, 10:38 वाजता

केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर बंदी

 

Onion Export : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर घातली बंदी.. 31 मार्च 2024 प्रयत्न घालण्यात आली बंदी..कांदा व्यापाऱ्यां सोबत शेतकऱ्यां मध्ये तीव्र नाराजी.. मनमाड, लासलगावसह बहुतांश बाजार समित्यात कांद्याचे लिलाव झाले नाही सुरु.. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा घेतला निर्णय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

8 Dec 2023, 09:50 वाजता

अवकाळी पावसामुळं मिरचीचं नुकसान

 

Bhandara Rain : अवकाळी पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील मिरचीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय...लाखो रुपयांची मिरची भिजलीय. त्यामुळे ती खराब होण्याची भीती शेतक-यांसह व्यापा-यांनाही आहे...त्याचबरोबर भाजीपालाही खराब होत असून...सरकारने तातडीने मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा -