12 Dec 2023, 21:01 वाजता
आमदार अपात्रता सुनावणी वेळापत्रकात बदल
MLA Disqualification Case : आमदार अपात्रता सुनावणी वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. शनिवारी, रविवारी सुनावणी रद्द करण्यात आली आहे. 20 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करणार असल्याची माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. उद्यापासून पुढील तीन दिवस लेखी उत्तरं घेणार.
12 Dec 2023, 20:10 वाजता
सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्याला विरोध- नितेश राणे
Nitesh Rane : 'मुख्यमंत्र्यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये', अशी मागणी भाजप आमदार नितेश राणेंनी विधानसभेत केली... सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला आमचा विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
12 Dec 2023, 19:44 वाजता
राज्य मागसवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रे
Rajya Magasvargiya Aayog : राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी आता सेवानिवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आलीय..न्या. आनंद निरगुडे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं आता त्यांच्या जागी न्या. शुक्रे यांना नेमण्यात आलंय.. त्याशिवाय मागासवर्ग आयोगाच्या तिघा सदस्यांनीही राजीनामे दिले होते. त्यांच्या जागी आता डॉ. ओमप्रकाश जाधव, डॉ. मारूती शिकारे आणि प्रा. मच्छिंद्रनाथ तांबे यांची नवे सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आलीय..
12 Dec 2023, 19:25 वाजता
'जुन्या पेन्शनसाठी पेन्शन नको, सरकारला टेन्शन द्या', उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Uddhav Thackeray : जुन्या पेन्शनसाठी आक्रोश करावा लागत असेल तर सरकारला पेन्शन नाही, टेन्शन देण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तसंच आपण मुख्यमंत्री असतो, तर जुन्या पेन्शनसाठी मोर्चाच काढावा लागला नसता, असं ठाकरेंनी म्हटंलय. उद्धव ठाकरेंनी आज नागपुरात सरकारी कर्मचा-यांच्या मोर्चाला भेट दिली.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
12 Dec 2023, 18:54 वाजता
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी SIT स्थापन
Disha Salian Death Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची SIT चौकशी होणारेय. त्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आलीय. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताय. एसआयटीत अपर पोलीस आयुक्त राजीव जैन, उपायुक्त अजय बंसल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा समावेश आहे. याप्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. आदित्य ठाकरे आणि मला समोरासमोर बोलवा असं आवाहन त्यांनी दिलंय. तर एसआयटी लावायची असेल तर लावा आम्ही देखील आमच्याकडची माहिती उघड करू अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
12 Dec 2023, 18:02 वाजता
नागपुरात युवा संघर्ष यात्रा पोलिसांनी अडवली
Nagpur Youvah Sangharsh Yatra : नागपुरात युवा संघर्ष यात्रा विधानभवनावर धडकलीये. पोलिसांनी युवा संघर्ष यात्रा अडवली आहे. बॅरिकेड्स टाकून कार्यकर्त्यांना रोखण्यात आलं आहे.
12 Dec 2023, 17:48 वाजता
Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'जुन्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक','जुन्या पेन्शनबाबत तोडगा काढणार','अहवालावर चर्चा करून निर्णय घेऊ','कुणाची स्क्रिप्ट वाचतात, ते लक्षात येईल','राज्य मागासवर्ग आयोगावर दबाव नव्हता','राजीनामे दिल्यानंतर पवारांची भेट घेतली','पोलिटिकल मास्टरनं सुपारी दिलीय', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप.
12 Dec 2023, 17:21 वाजता
Sanjay Raut Live | Marathi News LIVE Today : 'मी पवार साहेबांचा चेला आहे','मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, शरद पवारांचा चेला','आम्ही झुकलो नाही, वाकलो नाही','एक फूल आणि 2 डाऊटफूल',संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका.'मध्य प्रदेशची हवा महाराष्ट्राला लागणार नाही','आता देश सांगतोय मोदी आया, तो देश गया',मोदी 2024 ला येत नाहीत ही आमची गॅरंटी', संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल.
12 Dec 2023, 17:08 वाजता
चंदेरी पापलेटला मिळणार जीआय मानांकन
Pomfet Fish Got GI Nomination : मासे खवय्यांच्या आवडत्या पापलेटला आता जीआय मानांकन मिळणार आहे... मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली.. तव्यावरचं पापलेट फ्राय असो किंवा झणझणीत कालवण असू दे, पापलेट म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटतं... पापलेट हा महाराष्ट्रातला सर्वाधिक निर्यात होणारा मासाही आहे.. मात्र महाराष्ट्रात पापलेटचं उत्पादन घटतंय.. तेव्हा पापलेटच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने त्याला राज्य मासा हा दर्जा दिला होता.. आणि आता लवकरच त्याला जीआय मानांकनही मिळणार आहे.. नव्या निर्णयामुळे पापलेट संवर्धनास मदत होण्याची आशा आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
12 Dec 2023, 16:19 वाजता
राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा
Rajasthan New CM : भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.... वसुंधरा राजेंनी भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. भाजप आमदारांच्या आणि पक्ष निरीक्षकांच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. भजनलाल शर्मा हे सांगानेरचे आमदार आहेत. ते भाजपचे प्रदेश सरचिटणीस होते. छत्तीसगडमध्ये आदिवासी आणि मध्य प्रदेशात ओबीसी चेहरा दिल्यावर राजस्थानात मुख्यमंत्रीपदी भाजपनं ब्राह्मण चेहरा दिलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-